Thursday, March 12, 2026
Home ताज्या बातम्या नायगाव तलावाचा सांडवा फुटला, रस्ते उखडले, पाणी शेतात आमदार रोहित पवारांचे...

नायगाव तलावाचा सांडवा फुटला, रस्ते उखडले, पाणी शेतात आमदार रोहित पवारांचे अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश, शेतकऱ्यांना दिलासा

0
989

जामखेड न्युज—–

नायगाव तलावाचा सांडवा फुटला, रस्ते उखडले, पाणी शेतात

आमदार रोहित पवारांचे अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश, शेतकऱ्यांना दिलासा

जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी व मुसळधार पावसाने शेतकरी आणि सामान्य नागरिकांची अक्षरशः वाट लागली आहे. शेतातील उभ्या पिकांत पाणी वाहून गेलंय, माती खरवडून गेलीय, धान्य व घरातील वस्तू चिखलात आहेत. रस्ते, पूल, बंधारे व वीजेच्या सुविधा कोसळून नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे.

तालुक्यातील नायगाव येथील तलावाचा सांडवा फुटल्याने परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीके पाण्यात आहेत. नदीकाठच्या शेतीत सगळीकडे पाणीच पाणी आहे. रस्ते उखडले आहेत. याची पाहणी करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी फुटलेला सांडवा व उखडले रस्ते, पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. सांडव्यासाठी इरिगेशन अधिकाऱ्यांना फोन करून ताबडतोब इस्टीमेंट तयार करण्याच्या सूचना दिल्या. महसूल विभागाला नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.

काही ठिकाणी मोटारसायकल तर काही ठिकाणी पायी चालत नुकसानीची पाहणी केली. यावेळी शरद उगले, आश्रू उगले, गणेश उगले शिवसेना संपर्क प्रमुख कर्जत जामखेड, सुधीर उगले, गणेश गहिनीनाथ उगले, युवराज उगले, नितीन ससाने, अशोक लेंडे पाटील, संजय उगले, नंदकुमार उगले, संदीप उगले, संतोष शिंदे यांच्या सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

या भीषण परिस्थितीत आमदार रोहित पवार यांनी संवेदनशील पद्धतीने प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन नुकसानीची पाहणी केली. सोनेगाव येथील बंधारा, शेतातील पिकं, पुलाचा वाहून गेलेला भराव आदी नुकसानीसह वंजारवाडी, तरडगाव, खर्डा, जायभायवाडी, नायगाव अशा गावातील नुकसानीची पाहणी करत ग्रामस्थांना धीर दिला.


शेतकरी सध्या हतबल अवस्थेत आहे, त्याला या संकटातून सावरण्यासाठी धीर देणं आवश्यक आहे, हे अधोरेखित करत रोहित पवारांनी प्रत्यक्ष बळीराजाशी संवाद साधून त्याचा आत्मविश्वास उंचावला.

संकटात मदतीचा हात

अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्याने घरात शिरलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आमदार पवारांच्या कार्यकर्त्यांमार्फत किराणा साहित्याचं वाटप करण्यात आलं. “हा अडचणीचा काळ आहे. ज्यांच्या घरात पाणी घुसलं, ज्यांचं नुकसान झालं त्या प्रत्येक कुटुंबाला शक्य ते सहकार्य करा,” असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं.

वीज खंडित – रस्ते उद्ध्वस्त

नायगाव, जवळके, बावी, बोर्ला, जवळा आदी गावांत वीजेचे पोल कोसळून वीजपुरवठा खंडित झाला असून, रस्ते आणि पूल उद्ध्वस्त झाले आहेत. या संदर्भात प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने दुरुस्तीचे आदेश आमदार पवारांनी दिले आहेत.

नायगाव मध्ये सांडवा फुटल्याने पाणी शेतात शिरले सोयाबीन, ऊसात पाणीच पाणी झाले आहे. रस्ते उखडले आहेत. आमदार रोहित पवार यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले. शेतकऱ्यांना दिलासा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!