अमित चिंतामणी यांच्या वतीने महिलांसाठी मोफत मोहटादेवी दर्शन
अकरा वर्षापासून चिंतामणी यांचा स्तुत्य उपक्रम
आदर्श नगरसेवक व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे अमित चिंतामणी यांच्या वतीने जामखेड शहरातील महिलांसाठी मोफत मोहटादेवी दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या संधीचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन चिंतामणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नगरसेवक अमित चिंतामणी हे गेल्या अकरा वर्षांपासून नवरात्र महोत्सवा निमित्ताने शहरातील महिलांना पाथर्डी येथील मोहटा देवीच्या दर्शनासाठी घेऊन जात असतात. याच अनुषंगाने सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील बुधवार दि. २४ रोजी जुन्या स्टेट बँक जवळ देशमुख गढी येथे अकरा वाजता उपस्थित राहवे. अकरा वाजता गाड्या निघणार आहेत अशी माहिती नगरसेवक अमित चिंतामणी यांनी दिली आहे.
शारदीय नवरात्रोत्सव सुरु झाला आसल्याने पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवीच्या दर्शनासाठी अनेक भाविक भक्त मोहटा देवी गडावर लाखोंच्या संख्येने येत असतात. याच अनुशंगाने धार्मिक परंपरेचा वारसा लाभलेले भाजपचे आ.राम शिंदे यांचे खंदे समर्थक नगरसेवक अमित चिंतामणी हे गेल्या अकरा वर्षांपासून महिला भाविकांना मोहटा देवी दर्शन घडवुन आणतात.
याच अनुषंगाने बुधवार दि. २४ रोजी जामखेड शहरातील महीला भाविकांना मोहटा देवी दर्शन घडवुन आणण्यासाठी नगरसेवक अमित चिंतामणी यांनी मोफत चार चाकी वाहनांची सोय केली आहे.
मोहटा देवीच्या पायथ्याला सर्वांसाठी महाप्रसादाची सोय केली आहे. गेल्या अकरा वर्षापासून अमित चिंतामणी यांचा हा स्तुत्य उपक्रम सुरू आहे.