आता नगर, पुणे, मुंबईला जाण्याची आवश्यकता नाही, आपल्या जामखेड शहरात पन्हाळकर हाॅस्पीटल मध्ये मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजनेमार्फत विविध आजारांवर मोफत उपचार
आपल्या जामखेड शहरात पन्हाळकर हाॅस्पीटल मध्ये मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजनेमार्फत विविध आजारांवर मोफत उपचार
जामखेड शहरातील पन्हाळकर हाॅस्पीटल मध्ये एकत्रित आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे त्यामुळे या हाॅस्पीटल मध्ये आनेक आजारांवर आता मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
सुप्रसिद्ध हद्द रोग व मधुमेह तज्ञ डॉ गोविंद मुंडे हे पन्हाळकर हाॅस्पीटल येथे चोवीस तास उपलब्ध आसल्याने या रूग्णांना या रूग्णसेवेचा आधार मिळत आहे याच हाॅस्पीटल मध्ये कान नाक घसा तज्ञ डॉ शिवानी पन्हाळकर या ही रूग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत त्यामुळे आता वरील आजारांच्या रूग्णांना अहिल्यानगर पुणे बीडला जाण्याची गरज भासणार नाही.
तसेच आपघातग्रस्त रूग्णांची होणारी आर्थिक तुट देखील या योजनांच्या माध्यमातून थांबणार आहे शहरातील पन्हाळकर हाॅस्पीटलच्या माध्यमातून हाडांच्या रुग्णांनासाठी गेली आनेक वर्षे डॉ सुशील पन्हाळकर यांनी सेवा उपलब्ध करून दिली आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डॉ पन्हाळकर यांनी चार हजारांच्यावर यशस्वी रित्या ऑपरेशन केलेले आहेत.
जामखेड तालुक्यातील आनेक आपघातग्रस्त रुग्ण तसेच वयोमानानुसार हाडांच्या अवजारांनी ग्रस्त आसलेल्यांना या हाॅस्पीटलच्या माध्यमातून आधार मिळाला आहे पुर्वी हेच उपचार घेण्यासाठी नगर बीड आथवा तालुक्याबाहेर जावे लागत होते परंतु डॉ सुशील पन्हाळकरांनी पन्हाळकर हाॅस्पीटलच्या माध्यमातून ही रुग्ण सेवा जामखेड शहरात सुरू केली आणी नागरिकांनी त्यांना चांगला प्रतिसादही दिला आहे.
त्यामुळे जामखेड तालुका व परिसरातील रुग्णांनी या मोफत सर्व शासकीय रूग्ण सेवेचा लाभ घ्यावा असे अवहान डॉ सुशील पन्हाळकर व डॉ. शिवानी पन्हाळकर यांनी केले आहे