प्रगतशील शेतकरी अविन लहाने यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार

0
328

जामखेड प्रतिनिधी

         जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
   कृषी विभागाच्या वतीने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप प्रसंगी कृषी विभाग व आत्मा अंतर्गत कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अविन लहाने यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट शेतकरी 20-21 चा पुरस्कार प्रदान करण्यात आला यामुळे लहाने यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
       तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांच्या हस्ते अविन लहाने यांना पुरस्कार देण्यात आला यावेळी मंडल कृषी अधिकारी हिरडे मॅडम, आत्माचे प्रकल्प संचालक तुषार गोलेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रा. संजय वराट, साकत सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट, ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ वराट, महादेव वराट, नागेश वराट, दादासाहेब वराट, भरत लहाने, महादेव वराट सर, नानासाहेब लहाने याच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
      अविन लहाने यांनी रोपवाटिका क्षेत्रात (नर्सरी) क्षेत्रात व भाजीपाला क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान वापरून मोठ्या प्रमाणावर क्रांती केली आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. त्यांच्या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल कृषी विभाग व आत्मा अंतर्गत जिल्हास्तरीय उत्कृष्ट शेतकरी 20-21 चा पुरस्कार देण्यात आला या पुरस्कारामुळे अविन लहाने यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here