ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. पल्लवी वायकर यांचा प्रवास प्रेरणादायी
सोनेगाव (ता. जामखेड) येथील डॉ. पल्लवी शहाजी वायकर यांनी राज्यसेवा परीक्षेतयश संपादन केले. त्यांची राज्य कर विभागाच्या सहायक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. डॉ. पल्लवी यांचे वडील शहाजी वायकर हे सेवानिवृत्त शिक्षक, तर आई शिक्षिका आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पल्लवी यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. कठोर परिश्रम, चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे उल्लेखनीय यश मिळवले. डॉ. पल्लवी यांचे यश हे ग्रामीण भागातील सर्व युवक – युवतींसाठी प्रेरणादायी आहे.
१ सप्टेंबर २०२५रोजी डॉ. पल्लवी शहाजी वायकर यामुंबईतील जीएसटी भवन, माझगाव येथे प्रोबेशनरी असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स यापदावर रुजू झाल्या आहेत. माझगाव कार्यालयातील जॉइंट कमिशनर सुनील चव्हाण, डेप्युटी कमिशनर राहुल मोहकर यांनी त्यांचे स्वागत केले.
जामखेड तालुक्यातील सोनेगाव या गावची कन्या डॉ. पल्लवी शहाजी वायकर यांनी राज्यसेवा परीक्षेत यश संपादन केले आहे त्यांनी असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स या मानाच्या पदावर आपले स्थान पक्के केले होते. त्या 1 सप्टेंबर रोजी रूजू झाल्या आहेत.
डॉ. पल्लवी यांचे वडील शहाजी वायकर हे सेवानिवृत्त शिक्षक असून आई शिक्षिका आहेत. शैक्षणिक परंपरेला पुढे नेत त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. कठोर परिश्रम, चिकाटी आणि ध्येयधोरण यांच्या जोरावर त्यांनी हे उल्लेखनीय यश मिळवले आहे.
दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी डॉ. पल्लवी शहाजी वायकर यांनी मुंबईतील जीएसटी भवन, माझगाव येथे प्रोबेशनरी असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स या पदावर औपचारिकपणे रुजू झाल्या आहेत.