डॉ. संजय भोरे यांच्या प्रयत्नामुळेच स्व. विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव 20% अनुदान स्व. एम ई भोरे ज्यु. कॉलेज विज्ञान 40%, कला शाखेस 60% अनुदान टप्पा देण्याचा शासन निर्णय
डॉ. संजय भोरे यांच्या प्रयत्नामुळेच स्व. विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव 20% अनुदान
स्व. एम ई भोरे ज्यु. कॉलेज विज्ञान 40%, कला शाखेस 60% अनुदान टप्पा देण्याचा शासन निर्णय
बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या स्व. विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव ही शाळा डॉ. संजय भोरे त्यांनी कुसडगाव आपल्या संस्थेत संस्था व कर्मचारी यांच्या आग्रहाखातर घेतले व शासकीय शैक्षणिक प्रक्रिया पूर्ण केल्या यामुळे इतक्या दिवसांचा अनुदानाचा प्रश्न आता कुठे मार्गी लागला आहे. याचे सर्व श्रेय डॉ. संजय भोरे यांनाच जात आहे.
आत्ताचे सनराईज् मेडिकल & एज्युकेशन फौडेशन जामखेड या संस्थेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय संस्था व शाळेतील कर्मचाऱ्यांनी घेतला. त्याची संपूर्ण प्रोसेस सप्टेंबर 2021 ते डिसेंबर 2022 ( कोविड काळ असल्यामुळे विलंब होत गेला) कुसडगाव ते मंत्रालय मुंबई हा बऱ्याच टप्प्याचा प्रवास पूर्ण करून 1 मार्च 2023 ला शाळेचा हस्तांतर चा शासन जीआर निघाला त्यानंतर खऱ्या अर्थाने कुसडगाव ची शाळा सनराईज मेडिकल अँड एज्युकेशन फौडेशन या संस्थेस जोडली गेली. मग तेथून पुढे शासकीय अनुदान मिळण्यासाठी चा प्रवास सुरू झाला.
नवजीवन मेडिकल & एज्युकेशन फौडेशन जामखेड, आताचे सनराईज् मेडिकल अँड एज्युकेशन फौडेशन या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्यपूर्ण संघर्ष व नियोजनबद्ध कार्यपद्धती यांचे जिवंत उदाहरण म्हणजे कुसडगाव येथील स्व. विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय. दीर्घकाळापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या या शाळेला अखेर शासकीय अनुदानाचा शासन निर्णयाची, दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी राज्य सरकारच्या शिक्षण संचालक पुणे यांनी अघोषित अनुदान मंजूर केलेल्या शाळांची यादी जाहीर केली आहे.
स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालयची सुरुवात (जून2023) ला सूरू झाली, त्याला कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता मिळाली सन 2009 साली शासनाने कायम शब्द वगळला शाळेचे 2012 साली शाळेचे मूल्यांकन झाले. त्या मध्ये अनुशेषाचे पालन केले नाही. म्हणून शाळा अनुदानास अपात्र झाली. नियमानुसार अनुदानाचा मार्ग संपला त्यामुळे त्याची विद्यार्थी संख्या हळू हळू कमी झाली व विद्यालय बंद पडण्याच्या मार्गावर आले. सन 2021साली देव माणूस म्हणून डॉ. संजयजी भोरे यांचा संपर्क झाला व त्यांच्या पाडळी येथील साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय, स्व.एम.ई भोरे ज्युनिअर कॉलेज पाडळी, सनराईज इंग्लिश स्कूल, संभाजीराजे ज्युनिअर कॉलेज देवदैठण चा आलेख उंचावत होता.
साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय जून (2009 ) साली 100 % अनुदान मिळाले व स्व.एम.ई भोरे ज्युनिअर कॉलेज ला नोव्हेंबर 2020 पासून 20 % अनुदान मिळाले आता ते विज्ञान शाखा 40% व कला शाखा 60%अनुदान घेत आहे शिवशैल प्रतिष्ठान अहमदनगर या संस्थेने त्यांची स्व. विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय ही शाळा त्यांनी आत्ताचे सनराईज् मेडिकल & एज्युकेशन फौडेशन जामखेड या संस्थेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय संस्था व शाळेतील कर्मचाऱ्यांनी घेतला. त्याची संपूर्ण प्रोसेस सप्टेंबर 2021 ते डिसेंबर 2022 ( कोविड काळ असल्यामुळे विलंब होत गेला) कुसडगाव ते मंत्रालय मुंबई हा बऱ्याच टप्प्याचा प्रवास पूर्ण करून 1 मार्च 2023 ला शाळेचा हस्तांतर चा शासन जीआर निघाला त्यानंतर खऱ्या अर्थाने कुसडगाव ची शाळा सनराईज मेडिकल अँड एज्युकेशन फौडेशन या संस्थेस जोडली गेली. मग तेथून पुढे शासकीय अनुदान मिळण्यासाठी चा प्रवास सुरू झाला.
शाळेचे मूल्यांकन त्रुटी प्रस्ताव शिक्षण विभाग स्वीकारत नव्हता तो स्वीकारण्यासाठी विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे साहेब यांचे सहकार्य मिळाले. संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयजी भोरे साहेब यांनी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांना घेऊन तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांच्याकडे जाऊन त्यांनी खास बाब म्हणून 10 वर्षानंतर शाळेचा मूल्यांकन त्रुटी पूर्तता प्रस्ताव स्वीकारण्याचे पत्र शिक्षण विभागाला काढले व नंतर परिपूर्ण प्रस्ताव डॉ. संजयजी भोरे साहेब यांनी सन (2023) मध्ये शिक्षण विभागाला तात्काळ सादर करून मूल्यांकनास पात्र झाला.तो शासन स्तरावर अनुदानासाठी आघोषित होता मग शासनाने 10 ऑक्टोबर 2024 रोजी जीआर काढून 20% अनुदानास पात्र केले व शाळेला जीवनदान दिले.
ते आज पूर्णपणे ती शाळा जिवंत झाली. याचे सर्व श्रेय डॉ. संजयजी भोरे साहेब यांना जाते.या कार्यवाहीचा परिपाक म्हणजे जानेवारी 2023 मध्ये शासनाने अधिकृत जी.आर. काढून कुसडगाव शाळेचा हस्तांतरित समावेश पाडळी संस्थेत केला, आणि तेव्हापासून शाळेच्या अनुदान प्रवासाला गती मिळाली. या संपूर्ण प्रवासात पंचायत समिती, जिल्हा परिषद, उपसंचालक, संचालक, शिक्षण आयुक्त, मंत्रालय व शिक्षण मंत्री यांची मोलाची भूमिका राहिली.आज 4 सप्टेंबर 2025 रोजी अनुदान मंजूरीचा जी.आर. प्राप्त झाल्याने शाळेच्या कर्मचाऱ्यांत, पालकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह समाधानाचे वातावरण आहे.डॉ. संजय भोरे यांचे यशस्वी नेतृत्व आणि संस्थेचा दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोन हाच या यशाचा खरा पाया!