जगदंब प्रतिष्ठानची सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते महाआरती, जामखेड शहरातील विविध मंडळांना भेटी व आरत्या
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी जामखेड शहरातील जगदंब प्रतिष्ठान गणेश मंडळाची महाआरती तसेच शहरातील विविध मंडळांना भेटी देत आरती करत सर्व ग्रामस्थ व गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या. शहरातील सुमारे पंधरा मंडळांना भेटी देत आरती करत शुभेच्छा दिल्या.
शहरातील मेन पेठेचा राजा जगदंब प्रतिष्ठान आयोजित मंडळांच्या गणपतीची महाआरती करण्यात आली यावेळी संस्थापक अध्यक्ष तसेच भाजपा शहरमंडलाध्यक्ष संजय काशीद व मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभापती प्रा राम शिंदे यांची शहरातील विविध मंडळांना भेटी व आरतीशहरातील शिवराजे तरूण मंडळ काटकरवस्ती, शंभू राजे बाजारतळ, शिवशांती पोकळेवस्ती, वीरराजे बीड रोड, मार्केट चा सिद्धीविनायक, जय हनुमान तरूण मंडळ जाधव गल्ली, शिवसुर्य प्रतिष्ठान पोलीस स्टेशन रोड, जाणता राजा गृप, पोलीस स्टेशन रोड, धर्मज्योत संभाजीनगर, योध्दा गृप मोरे वस्ती, रामचंद्र तरूण मंडळ कुंभार गल्ली, संघर्ष मित्रमंडळ कोर्ट रोड, जगदंब प्रतिष्ठान मेनरोड, महासंग्राम युवा मंच लक्ष्मी चौक, सावता गृप बोराटे वस्ती यासह अनेक मंडळांना भेटी देत आरती करत गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अजय काशीद, भाजपा शहरमंडलाध्यक्ष संजय काशीद, प्रविण चोरडिया, मनोज कुलकर्णी,माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, पोपट नाना राळेभात, तात्याराम पोळके, संजय राऊत, डॉ. विठ्ठल राळेभात, पवन राळेभात, प्रविण होळकर, शिवाजी येवले, अनिकेत जाधव यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
शहरातील मेन पेठेचा राजा गणेश मंडळांची महाआरती करताना जगदंब प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष संजय काशीद, अध्यक्ष महेश निमोणकर, अविराज बेलेकर, उमेश फाटे, राजू भांबे, अजय गौड, बाळासाहेब जगदाळे, किशोर काळे, संग्राम मते, निलेश तवटे, मनोज अष्टेकर, कृष्णा अष्टेकर, संतोष शिंदे, डॉ. सुशील पन्हाळकर, विराज फुटाणे, गोरख कुलथे, अशोक पोहरे, अभिजीत उदारे, बाळासाहेब उळाळे, बाळासाहेब निमोणकर आनंद झगडे, अनिकेत झगडे, अशोक साळवे, शरद निकम, साईल कांबळे, आदित्य सांळुखे, विशाल निमोणकर, सार्थक जाधव, समर्थ जगताप, संदीप जाधव, रूद्रा जाधव यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
चौकट आदर्श फाऊंडेशन चे अध्यक्ष आकाश बाफना यांच्या वतीने शहरातील गणेश भक्तांचे स्वागत कक्ष उभारून स्वागत करण्यात येत आहे.