मोबाईलच्या दुनियेत वाचन संस्कृती जपा -जालिंदर खताळ ल. ना. होशिंग विद्यालयात ग्रंथ राखी उपक्रम

0
323

जामखेड न्युज——

मोबाईलच्या दुनियेत वाचन संस्कृती जपा -जालिंदर खताळ

ल. ना. होशिंग विद्यालयात ग्रंथ राखी उपक्रम

मोबाईलच्या दुनियेत विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासल्यास भावी आयुष्यात खुपच फायदा होतो असे सांगत विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले विद्यार्थांबरोबर ग्रंथ आणि वाचन संस्कृती विषयी मुलांबरोबर संवाद साधला. व वाचन संस्कृती जपण्याचे आव्हान शिक्षण विस्तार अधिकारी जालिंदर खताळ यांनी केले.

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल.ना.होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक 29 आँगस्ट 2025 वार शुक्रवार रोजी ‘ग्रंथ हेच आपले गुरू’ प्राचार्य बाळासाहेब पारखे यांच्या संकल्पनेतून विद्यालयातील इ पाचवी वर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षिका प्रतिनिधी श्रीमती घायतडक सुप्रिया,जेष्ठ अध्यापिका श्रीमती दराडे संगिता आणि विद्यालयाचे ग्रंथपाल देशमुख संतोष यांनी ग्रंथ राखी उपक्रम ‘आयोजित करण्यात आला.

या अभिनव कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय जालिंदर खताळ साहेब व मान्यवरांच्या, विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते ग्रंथालयातील ग्रंथांना राखी बांधून उद्घाटन करण्यात आले. तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी ग्रंथांना राखी बांधून “पुस्तक माझा सखा, वाचन माझा श्वास ” हा संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ अध्यापिका श्रीमती दराडे संगिता यांनी केले.

यावेळी कु.जारा सय्यद इ.५ वी तु.अ,कु.जिया पठाण इ.५ वी तु.ब आणि चि.कार्तिक घुमरे इ. ५ वी तु.अ या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.चि.दुर्वेश चव्हाण इ.५वी तु.अ या विद्यार्थ्याने “पुस्तक संरक्षण शपथ ” सर्व विद्यार्थ्यांना दिली. पुस्तक संरक्षण शपथ घेऊन पुस्तकांचा आदर व पुस्तकांचे संरक्षण करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.विद्यालयातील ग्रंथपाल देशमुख संतोष यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे महत्त्व, जतन आणि वाचनाची सवय याबद्दल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे यांनी आपले मार्गदर्शन करतांना “पुस्तक म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर आहे.ज्या समाजात व देशात वाचनाची आवड निर्माण होते.तो समाज तो देश नक्कीच प्रगतीच्या शिखरावर पोहोचतो.आज तुम्ही पुस्तकांना राखी बांधून ते आमचे जिवलग बंधूच आहेत हा संदेश दिला.असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे छायाचित्र व व्हिडीओ निर्मिती विद्यालयाचे उपक्रमशील अध्यापक भोसले साईप्रसाद यांनी केली.

या कार्यक्रमासाठी ल ना होशिंग ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य युवराज भोसले साहेब, उपमुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने साहेब,पर्यवेक्षक अनिल देडे सर,कार्यालयीन अधिक्षक ईश्वर कोळी भाऊसाहेब,मुकुंदजी सातपुते सर, जेष्ठ अध्यापक भरत लहाने सर,मुकुंद राऊत सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख नरेंद्र डहाळे,पोपट जगदाळे , श्रीबबन राठोड, रोहित घोडेस्वार,विशाल पोले आणि सर्व अध्यापक बंधू – भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुप्रिया घायतडक यांनी केले व आभार प्रदर्शन आदित्य देशमुख यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here