जामखेड करांच्या इडा पिडा दूर होऊ द्या – आकाश बाफना आदर्श फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना यांच्या हस्ते अनेक ठिकाणी आरती

0
70

जामखेड न्युज—–

जामखेड करांच्या इडा पिडा दूर होऊ द्या – आकाश बाफना

आदर्श फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना यांच्या हस्ते अनेक ठिकाणी आरती

सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना यांनी शहरातील अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या अनेक ठिकाणी त्याच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी त्यांनी गणरायाकडे जामखेड करांच्या इडा पिडा दूर होवोत अशी प्रार्थना केली.

यावेळी आदर्श फाऊंडेशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य यांच्या सह भाजपाचे शिवकुमार डोंगरे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे गणेश चतुर्थी हे एक धार्मिक व्रत आहे. या दिवशी घरी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून सुखकर्ता, विघ्नहर्ता गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते.

वर्षभरानंतर येणार्‍या गणेशोत्सवामुळे गणेशभक्तांत उत्सुक्ता असून दि.२७ ऑगस्ट २०२५ रोजी ताड मृदुंग व ढोल ताशांच्या गजरात विघ्नहर्ता गणरायाची मोठ्या जल्लोषात आगमन होऊन प्रतिष्ठापना केली गेली. आदर्श फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश शेठ बाफना यांचे हस्ते जामखेड शहरातील अनेक गणेश मंडळांची जागोजागी आरत्याकरून प्रतिष्ठापना करण्यात आल्या.

यावेळी बोलताना आकाश शेठ बाफना म्हणाले की, निसर्गापुढे शेतकरी राजा हवालदील झाला आहे. गोरगरिबांना जिवन जगणे अवघड होत आहे. माझा शेतकरी राजा आणि गोरगरीब जणता आनंदी रहावे. त्यांच्या सर्व इडा पिडा टळो या करिता मी गणरायाकडे साकडे घातले असल्याचे त्यांनी सांगितले. जामखेड शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती.

रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने शहर झगमगत आहे. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. यामध्ये सांस्कृतिक, आरोग्य शिबिर, भजन, किर्तन, असे विविध प्रकारच्या कार्यक्रमांची रेलचेल असते. तर अनेक ठिकाणी स्पर्धांचे आयोजन सुद्धा केले जात आहे. दि.२७ ऑगस्ट रोजी जामखेड शहरात गणेश चतुर्थीला विघ्नहर्ता गणरायाची मोठ्या जल्लोषात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here