जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्जत-जामखेडचे युवा आमदार रोहित पवार गेल्या तीन दिवसां पासून जनसंपर्कात नव्हते. अनेकांचे त्यांनी फोनही घेतले नाही. यामुळे कार्यकर्ते आणि चाहत्यांना याबद्दल काळजी वाटत होती.
आज स्वतः आ.रोहित यांनी याबाबतचा खुलासा एक ट्विट करून केला असून त्यात त्यांनी आपण गेल्या तीन दिवसांपासून तब्येत ठीक नसल्याने डॉक्टरांच्या सल्याने आराम करत होतो. आज सोमवारी बरे वाटत असून एखादा दिवस अजून अराम करणार आहोत असे सांगितले आहे. आपले सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत. काळजीचे कारण नाही, लवकरच आपण पुन्हा नागरिकांसाठी उपलब्ध असू, या दरम्यान अनेकांचे फोन घेता आले नाही याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे..
मतदारसंघात किंवा राज्यात आ.रोहित पवार यांचा जनसंपर्क मोठा आहे. त्यामुळे गेल्या तीनदिवसांपासून ते अनेकांच्या संपर्कात नव्हते. त्यामुळे कार्यकर्ते आणि चाहते हे काळजीत होते. आज त्यांनी तब्येतीचे कारण स्पष्ट करताना सर्व ठीक असल्याचे सांगितले आहे. पक्षात ते आमदार असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे असल्याने त्यांच्या बद्दल मोठी उत्सुकता कार्यकर्त्यांत असते. पण आमदार रोहित पवार यांनी स्वतःच्या कर्तुत्वावर संपुर्ण राज्यात वलय निर्माण केले आहे. सामान्य नागरिकांत त्यांचा असलेला वावर हा सध्या चर्चेचा विषय आहे. कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी नंतर त्यांनी याभागात जात सामान्य नागरिकांना मदतीचा हात दिला आहे.