गावरान कोंबडी खरेदीसाठी आलेल्या सहायक पोलिस निरीक्षककासह चार जणांना ग्रामस्थांकडून मारहाण २५ जणांवर गुन्हा दाखल – खोटा गुन्हा मागे घ्यावा चोरांवर नावासहित गुन्हा दाखल करावा असे न झाल्यास संपुर्ण ग्रामस्थ तहसिल कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा वंजारवाडी ग्रामस्थांचा इशारा

0
209
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज –( सुदाम वराट) 
   तालुक्यातील अरणगाव परिसरात गावरान कोंबडी खरेदी करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चौघेजण चारचाकी वाहनातून आले होते. ग्रामस्थांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु वाहन न थांबल्याने दुचाकीस्वारांनी वाहनाला दुचाकी आडवी घालून वाहन थांबवून  जमलेल्या २० ते २५ जणांनी सदर वाहनावर दगड मारून वाहनातील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चौघांना बाहेर काढून लोखंडी रॉड, बांबू, दगड व काठीने मारहाण केली. अरणगाव सरपंच वेळीच आल्याने त्यांनी मारहाण करणाऱ्या जमावातून चार जणांना सोडवले. याबाबत जामखेड पोलीसात खुनाच्या प्रयत्नासह १२ प्रकारचे विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
       तर या गुन्ह्य़ाविरोधात आज वंजारवाडी ग्रामस्थांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन सदर गुन्हा चुकीचा दाखल करण्यात आला आहे तेव्हा चोरांवर नावासहित गुन्हा दाखल करावा असे न झाल्यावर सर्व ग्रामस्थ तहसिल कार्यालयासमोर उपोषणाला बसतील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
     याबाबत जामखेड पोलीसांत विशाल भानुदास कांबळे (रा. भिमनगर ता. आष्टी, जि. बीड) यांनी फिर्याद दिली की, आष्टी तालुक्यातील पांडेगवहाण येथील वस्तीवर गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय असून खेडोपाडी जाऊन कोंबडी खरेदी करत असतो. शुक्रवार दि.६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जवळच असलेल्या अरणगाव व परिसरातून कोंबड्या खरेदीसाठी इंडोगो कारमध्ये (क्रमांक एम एच ०६ – ५५०३) भाऊ बुलढाणा नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कांबळे, सासरे संजय विठ्ठल निकाळजे व सुनिल निकाळजे यांच्यासमवेत खेडोपाडी गेलो होतो पण कोंबड्या न मिळाल्याने अरणगाव बसस्थानक येथे आल्यानंतर मोटारसायकल वरून डबलशीट आलेल्या इसमांनी कारला दुचाकी आडवी लावून शिवीगाळ करून आम्हाला गाडीतून खाली उतरण्यास धमकावले. यावेळी बाळासाहेब रावसाहेब मिसाळ, डॉ. सुरज रामकिसन जायभाय, राजु तुकाराम जायभाय, तुकाराम जायभाय, रामकिसन सोनबा जायभाय, मधुकर दत्तू जायभाय, शिवाजी जायभाय (पिकअप मालक), बबन भगवान दराडे, सतिश ( पूर्ण नाव माहीत नाही) रा. वंजारवाडी व इतर २० ते २५ जणांनी आमच्या गाडीवर मोठमोठे दगडे मारून काचा फोडल्या व बळजबरीने गाडीचे दरवाजे उघडून आम्हाला बाहेर खेचून त्यांच्या हातातील लोखंडी रॉड, बांबू, दगडाने व काठीने मारहाण केली त्यातील काहींनी आमच्या खिशातील ५० हजार रूपये हिसकावून घेऊन जबर मारहाण करीत होते. माझा भाऊ किरण कांबळे हा सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे असे सांगत होता तरीही बेकायदा मंडळी मारहाण करीत होते. यादरम्यान तेथे अरणगावचे सरपंच अंकुश शिंदे व त्यांचे कार्यकर्ते आले व त्यांनी आम्हाला सोडवले.
अशी फिर्याद विशाल भानुदास कांबळे यांनी दाखल केली यावरून पोलीसांनी भादवी कलम ३०७,३४१, ३२९, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ५००, ५०४, ५०६, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांचे शोधपथक आरोपींचा शोध घेत आहे.
     या विरोधात वंजारवाडी ग्रामस्थ आज एकवटले व तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले यात म्हटले आहे की, दि. ६ आॅगस्ट रोजी गावातील मधुकर दत्तू जायभाय, शिवाजी बाबासाहेब जायभाय, नाजुका बाबासाहेब जायभाय, आशाबाई व हनुमंत जायभाय यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील पैसे व दागिने चोरी झाली याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामसुरक्षा यंत्रणेवरती फोन आल्यावर गावातील व बाहेरील तरूणांनी चोराची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला गाडी थांबली नाही त्यामुळे पुढील गावात फोन करून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा अरणगाव परिसरात गाडी थांबवली यावेळी चोरांनी उलटसुलट भाषा वापरत बाचाबाची झाली होती. ज्या व्यक्तीच्या घरात चोरी झाली त्या प्रतिष्ठित व्यक्ती वर ३०७ चा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर चोर सराईत असुन त्यांची नावे किरण भानुदास कांबळे, विशाल भानुदास कांबळे, संजय विठ्ठल निकाळजे, सुनिल कचरू निकाळजे व इतर दोघे मोटारसायकलवरती माल घेऊन गेले सदर चोरांनी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींची नावे कोणाच्या तरी सांगण्यावरून टाकण्यात आली आहेत. सदर गुन्हा मागे घ्यावा चोरांवर नावासहित गुन्हा दाखल करावा चार दिवसात कारवाई न झाल्यास तहसिल कार्यालयासमोर संपुर्ण ग्रामस्थ उपोषणाला बसतील असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. सदर निवेदनावर संजय जायभाय, उद्धव नागवडे, दगडू फुंदे रमेश ओमासे, शरद कार्ले, सह शेकडो लोकांच्या सह्या आहेत.
     या दोन्ही घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here