जामखेड तालुक्यातील शेतकऱ्याचा करंट लागून मृत्यू, परिसरात शोककळा
तालुक्यातील सातेफळ येथील शेतकरी बाळासाहेब दाताळ यांचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
जामखेड तालुक्यातील सातेफळ गावात एका दुर्दैवी घटनेत, बाळासाहेब दाताळ (वय ४५, रा. सातेफळ) यांचा २५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६:३० वाजता कडबाकुट्टीच्या ठिकाणी विजेचा करंट लागून मृत्यू झाला.
ते त्यांच्या जनावरांना खाण्यासाठी कडबाककूट्टी करत होते. तेव्हाच करंट आला आणि कुट्टीवर चिकटल्याने त्यांचा मृत्यू झाला.या घटनेमुळे सातेफळ परिसरात मोठी शोककळा पसरली असून गावकऱ्यांत दु:ख व्यक्त केले जात आहे.मृत शेतकऱ्याच्या मागे दोन मुले, पत्नी आणि एक मुलगी असा कुटुंब आहे.
सातेफळवासीयांनी बाळासाहेब यांच्या पश्चात त्यांचा कुटुंबाला आर्थिक निधी मिळवून देण्याची जबाबदारी घ्यावी याबाबत प्रशासनाकडून अन्याय होऊ न देण्याची आणि त्यांच्या सुरक्षिततेसंबंधी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
या प्रसंगामुळे ग्रामीण भागातील विजेच्या सुरक्षेची आणि अपघात टाळण्याची गरज अधोरेखित होत आहे.अशा प्रकारे विजेचा शॉक लागून जामखेड तालुक्यात अनेक घटनांमध्ये नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे याबाबत वीज कंपनीने लक्ष देण्याची काळाची गरज आहे.