जामखेड नगरपरिषद निवडणूक प्रभाग रचना जाहीर, पहा आपला भाग कोणत्या प्रभागात. ३१ ऑगस्टपर्यंत हरकतींसह सूचना मांडण्याची संधी

0
1234

जामखेड न्युज—–

जामखेड नगरपरिषद निवडणूक प्रभाग रचना जाहीर, पहा आपला भाग कोणत्या प्रभागात.

३१ ऑगस्टपर्यंत हरकतींसह सूचना मांडण्याची संधी

 

जामखेड नगरपरिषदेच्या सन २०२५ ते २०३० साठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध करण्यासाठी आणि त्यावर हरकती व सूचना मागविण्यासाठी जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी आज सोमवारी दि. १८ रोजी प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्धीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यानुसार इच्छुकांसाठी कोणाला फायद्याचा तर कोणाला अडचणीचा वाटत आहे. अडचणीचा वाटणारे हरकती दाखल करतील यामुळे आता इच्छुक कामाला लागले आहेत.

जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी साळवे यांनी सोमवारी (ता. १८) प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्धीची अधिसूचना प्रसिद्ध केली असून, त्यावर ३१ ऑगस्टपर्यंत जनतेच्या हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या. या हरकती व सूचना नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करावयाच्या आहेत, तर प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमांसंदर्भात हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणी करिता उपस्थित राहण्यासाठी नगरपरिषदे मार्फत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.

दि. १ सप्टेंबर ते ८ सप्टेंबरदरम्यान प्राप्त हरकती व सूचनांवर जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत सुनावणी घेण्यात येणार आहे. ९ सप्टेंबर ते ११ सप्टेंबरदरम्यान सुनावणी नंतर हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना जिल्हाधिकारी मुख्याधिकाऱ्यांमार्फत नगरविकास विभागास सादर करण्यात येणार आहे.


प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना नगर विकास विभागामार्फत १२ सप्टेंबर ते १८ सप्टेबरदरम्यान राज्य निवडणूक
आयोगास सादर करण्यात येईल, तर २६ सप्टेबर ते ३० सप्टेबर या कालावधीत राज्य निवडणूक आयोगा मार्फत अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे मुख्याधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झालेल्या निवडणूक कार्यक्रमा नुसार जामखेड या “क” वर्ग नगरपरिषदेचीही निवडणूक प्रक्रिया जाहिर झाली असून दि., १० जुलै २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार जामखेड नगरपरिषदेसाठी निवडून देण्यात येणाऱ्या नगरसेवकांची एकुण संख्या २४ असणार असून त्यापैकी सर्व प्रवर्गातील मिळून १२ जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत.

पहा आपला भाग कोणत्या प्रभागात

 

1 प्रभाग क्रमांक एक
जांबवाडी संपूर्णगाव, माने वस्ती, शिरगिरे वस्ती, शेळकेवस्ती भूतवडा संपूर्ण गाव, पांडव वस्ती, गवळी वस्ती, लेहनेवाडी गावठाण, अडाले वस्ती, मगर वस्ती, जगताप वस्ती, दांडगे वस्ती, पवार वस्ती, राळेभात वस्ती (लेहनेवाडी), शिक्षक कॉलनी परिसर, जलशुद्धीकरण केंद्र परिसर,लघुपाटबंधारे कार्यालय परिसर, शासकीय दुधसंघ परिसर

2 प्रभाग क्रमांक दोन
बीड रोड (पूर्व भाग),खडी सेंटर परिसर, विकास नगर, साकत फाटापूर्व भाग, गौयकर वस्ती, सुपेकर व अडालेवस्ती, धोत्री गाव, काळभोर वस्ती, अडालेवस्ती, सपकाळवस्ती, मंडलिक वस्ती, राळेभात वस्ती-१. राळेभात वस्ती – २, मोरे वस्ती, तुकाई माळ परिसर, संताजी नगर, शिवाजी नगर, विद्या नगर, मार्केट यार्ड व बैलबाजार परिसर, प्रजापिता ईश्वरी ब्रम्ह कुमारी विश्व विद्यालय परिसर.

3 प्रभाग क्रमांक तीन

ग्रामीण रुग्णालय, ल.ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पश्चिम भाग परिसर, दत्त नगर, जिल्हापरिषद मराठी मुले व मुलींची शाळा परिसर,जामखेड महाविद्यालय परिसर, जुने तहसिल कार्यालय, जुने पोलिस स्टेशन कार्यालय, नवीन तहसिल कार्यालय परिसर, नवीन पोलिस स्टेशन कार्यालय परिसर, प्राध्यापक कॉलनी, सुखशांती नगर, गोडाऊन गल्ली, बर्फ कारखाना परिसर,कुंभार गल्ली, राळेभात गल्ली, लोकमान्य शाळापरिसर, (नवीन प्राथमिक मराठी मुलांची शाळा )राम मंदिर परिसर, सुतार गल्ली. मल्लीकार्जुनमंदिर परिसर, नवीन नगरपरिषद शेजारील सभागृह, नाना नानी पार्क.

4 प्रभाग क्रमांक चार
एच. यु. गुगळे कापड शॉप कॉम्प्लेक्स, जुनी खानावळ गल्ली, कोर्टगल्ली (उत्तर बाजू), मुख्य पेठ पूर्व भाग,कोर्ट गल्ली, लोकमान्य रीडिंग हॉल कॉम्प्लेक्स, सोनारगल्ली, मुख्य पेठ कॉम्प्लेक्स, जुनी स्टेट बँक कॉम्प्लेक्स, सिद्धार्थ नगर, साठे नगर, काजी गल्ली, विठ्ठल मंदिर कॉम्प्लेक्स, देशमुख परिसर.

5 प्रभाग क्रमांक पाच
बाळासाहेब मोरे यांचे गाळे व घरापासून ते साहेबराव गायकवाड यांचे कापड दुकान पर्यंतचा परिसर, नागेश शाळेचा परिसर, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी परिसर, गोरोबा टाकीज शेजारील परिसर, पारधी गल्ली, बुरुड गल्ली, संतोषी माता मंदिर दक्षिण बाजू कुंभारतळ, बाजारतळ, जुने नगरपरिषद कार्यालय परिसर, दुर्गा माता मंदिर परिसर, बीडकॉर्नर ते सय्यद हाजी मंजूर कमान पर्यंतचा पश्चिमे कडील भाग.

6 प्रभाग क्रमाक सहा
मिलिंद नगर परिसर,नवीन शिक्षक कॉलनी परिसर (भूतवडा रोड)कान्होपात्रा नगर, आंबेडकर ब्लॉक परिसर,भोसले नगर, तपनेश्वर जि.प.मराठी शाळा परिसर, मिलिंद नगर उत्तरेकडील बाजू, भूतवडारोड सार्वजनिक शौचालयपर्यंत, तपनेश्वर स्मशानभूमी रोड पूर्व भाग, मिहीर मंगलकार्यालय ते ओम हॉस्पिटल पर्यंत बीड रोडज्ञपश्चिम बाजू

7 प्रभाग क्रमांक सात
संतोषी माता मंदिर उत्तरेकडील परिसर, काजल साडी सेंटर व उत्तरेकडील परिसर, डांगरे गल्ली शेंडकर गल्ली,वासकर गल्ली, अक्सा मस्जिद परिसर, ढवळे किराणा परिसर, डॉ. पवार हॉस्पिटल परिसर(संजीवनी हॉस्पिटल), महादेव मंदिर परिसर पोकळे यांचे गाळे व पश्चिमेकडील परिसर

8 प्रभाग क्रमांक आठ
तपनेश्वर रोड कडिल कब्रस्तान, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बस डेपो, महावीर मंगल कार्यालय परिसर, पंचायत समिती कार्यालय परिसर, न्यायाधीश निवासपरिसर, खाडेनगर, घोडके हॉस्पिटल किनारा हॉटेल परिसर, जुनी पोकळे वरती, आनंद कॉलनी, अर्बनबँक परिसर, नुरानी कॉलनी समोरील परिसर, कॉलनी, तपनेश्वर कॉलनी, नुरानी मदरसा, मारुती मंदिर परिसर, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, आयकॉन सिटी परिसर, ईदगाह मैदान परिसर, शासकिय गोडाऊन परिसर, BSNL ऑफिस परिसर, आंबेडकर ब्लॉक परिसर, जामखेड बस स्थानक परिसर, बँक ऑफ महाराष्ट्र परिसर, वर्धमान सोसायटी, जामखेड सेंट्रल कॉम्प्लेक्स, स्वामीसमर्थ मंदिर.

9 प्रभाग क्रमांक नऊ
स्वामी समर्थ मंदिर परिसर, काटकर वस्ती, गणेश बाग परिसर, हजारे तालीम परिसर, पेट्रोल पंप व पूर्वेकडील भाग, साईबन मंगल कार्यालयपरिसर, वृंदावन लॉन्स परिसर, वडाची वस्ती,अहिल्यावस्ती परिसर, खडकवाडी, म्हेत्रे वस्ती,गणेश नगर, उत्कर्ष हॉटेल परिसर, कोठारीपेट्रोल पंप, नविन पोकळे वस्ती, साई गार्डन परिसर, फुलमाळा परिसर, फुले वस्ती जलकुंभच्या उत्तरेकडील भाग, फयाज गँरेज घराचा परिसर, खंडोबा मंदिराचे उत्तरेकडील परिसर,काटकर मेजर यांचे घराजवळील परिसर,पशुवैद्यकीय दवाखान्याच्या दधिणेकडील बाजू,रामेश्वर हॉस्पिटल परिसर, टेकाळे नगर, डॉ.झगडे हॉस्पिटल परिसर.

10 प्रभाग क्रमांक दहा

सदाफुले वस्ती, टेकाळे नगर, रामेश्वर हॉस्पिटल परिसर, कुरेशीनगर, जिजामाता बी. एड. कॉलेजचे पश्चिमेकडील परिसर, लक्ष्मीआई मंदिर परिसर,शनी मंदिर परिसर, जुम्मा मस्जिद परिसर,मुस्लीम गल्ली, सय्यद नगर, ख्वाजा नगर, चौरे गल्ली.

11 प्रभाग क्रमांक अकरा
महादेव गल्ली(दक्षिण बाजू) मुंजोबा गल्ली, नागेश्वर नगर, गोरक्षनाथ नगर, साईनगर, गुलमोहर सोसायटी, बोराटे वस्ती, वेलेकर वस्ती, अचल वस्ती, बटेवाडी, खरात वस्ती, काळे वस्ती, जमादारवाडी गाव, नेटके वस्ती, समता नगरपरिसर (पूर्वेकडील वाजू) नवीन कोर्ट परिसर,नवीन म्हाडा घरकुल वसाहत

12 प्रभाग क्रमांक बारा
इंदिरानगर,दुर्गामाता सोसायटी, करमाळा रोड पूर्व वाजू, वैदू वस्ती, द्रोणागिरी सोसायटी, निमोणकर वस्ती – १.निमोणकर वस्ती – २, आजबे वस्ती, चुंबळी, गडदे वस्ती, हुलगुंडे वस्ती, बालाजी स्टोन क्रेशर परिसर, गिरमे फार्म परिसर, आयटीआय परिसर,काळंगे वस्ती, कोल्हे वस्ती, गॅस गोडाऊन परिसर, खंडोबा बस्ती, जावळे मळा, राऊत मळा, डॉ. नजीराबानो हॉस्पिटल परिसर व वसाहत

अशा प्रकारे बारा प्रभाग झाले आहेत प्रत्येक प्रभागात दोन नगरसेवक नगरसेवक असणार आहेत. ज्यांना प्रभाग योग्य नियमानुसार वाटत नाही त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत हरकतींसह सूचना मांडण्याची संधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here