जामखेड न्युज—–
जामखेडमध्ये युवकाचा खुन, परिसरात एकच खळबळ
जामखेड खर्डा रोडवरील शिऊर फाटा येथील हाॅटेल मध्ये किरकोळ कारणावरून रविवारी दि. १७ रोजी रात्री एका युवकाचा खुन झाला ही घटना सकाळी उघडकीस आली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जामखेड पोलीसांनी खुन करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.
जामखेड तालुक्यातील सारोळा येथील जोतिराम शामराव काशीद (वय 36) रा. काशिद वस्ती सारोळा ता. जामखेड जि. अहिल्यानगर हे रविवारी सायंकाळी खर्डा रोड शिऊर फाटा येथील हाॅटेलवर जेवण करण्यासाठी गेले होते.
जेवण झाल्यावर हाॅटेल मधील कामगार दिपक गुलाबराव सातपुते रा. मनमाड जि. नाशिक व जोतीराम काशिद यांच्या मध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. यामध्ये कामगार दिपक सातपुते याने जोतीराम काशिद यांच्या डोक्यात व अंगावर लाकडी काठीने मारहाण करून यांचा खुन केला आहे. ही घटना सकाळी सर्वाना माहित झाली तेव्हा परिसरात एकच खळबळ उडाली. तशी फिर्याद लक्ष्मण शामराव काशिद वय 30 व्यवसाय शेती यांनी फिर्याद दिली आहे.
घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणकुमार लोखंडे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे,पो. ना. रविंद्र वाघ, पो. कॉ. देवीदास पळसे,नवनाथ शेकडे, गणेश काळाने, कुलदीप घोळवे
यांनी घटनास्थळी भेट दिली व जामखेड पोलीसांनी आरोपीस ताब्यात घेतले. मयत जोतिराम शामराव काशीद यांच्या मागे आई वडील, एक भाऊ भाजजयी असा परिवार आहे.