विविध सामाजिक उपक्रमांनी जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे-पाटील यांचा वाढदिवस साजरा मी अनुभवलेले अतुल खुपसे पाटील म्हणजे प्रति बच्चूभाऊ कडूच – गणेश भानुसे
विविध सामाजिक उपक्रमांनी जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे-पाटील यांचा वाढदिवस साजरा
मी अनुभवलेले अतुल खुपसे पाटील म्हणजे प्रति बच्चूभाऊ कडूच – गणेश भानुसे
जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनशक्ती शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष गणेश भानुसे यांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तसेच शालेय मुलांना वहया व पुस्तकाचे वाटप, वृद्धाश्रमामध्ये जेवन अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मी अनुभवलेले अतुल खुपसे पाटील म्हणजे प्रति बच्चूभाऊ कडूच – गणेश भानुसे दि. २३ मे २०१७ चा तो दिवस. मित्राच्या मोबाईलवर एका whats app ग्रूपवर बच्चु कडु सोलापूर मध्ये येणार असल्याचे समजले. त्या मेसेज वरील नंबर ला फोन लावला अन् पहिल्यांदा खुपसे पाटील कळले. बोलण्यात नम्रता, प्रेम दिसलं.. “हो हो बच्चु भाऊ येणार आहेत सोलापूर ला. या भेट होईल तुमची. जवळ आले की फोन करतो” असं सांगुन पुन्हा अर्ध्या तासात बच्चु भाऊ सोलापूर येथे आल्याचा फोन आला.
अपंग बंधु-भगिणींचे शिबिर होते काहीतरी त्यादिवशी. बच्चु कडुंसोबत सेल्फी झाला. खुपसे पाटलांना पाहिलं. पण दुर्दैवाने समोरासमोर भेट अथवा बोलणं झालंच नाही. खरं तरं कधी-कधीच बघणं व्हायचं बच्चु भाऊंना सोशल मिडीया चा माध्यमातून. मात्र त्यादिवसापासुन यु ट्युब, फेसबुक च्या माध्यमातून बच्चु भाऊंसोबत जोडलो गेलो. त्यांची समाजसेवा, कामाची पद्धत, साधी राहणी अन् उच्च विचारसरणी, अंध, अपंग, विधवा निराधारांची सेवा, आसुड यात्रा, राहुटी, आमदार आपल्या दारी हे पाहिलं. या प्रत्येक फोटोत बच्चु कडुंचा कार्यकर्ता म्हणून अतुल खुपसे-पाटील असायचेच. सादमुद बच्चु कडुंसारखा चेहरा.. केसांची ठेवण.. जबड्यावरची दाडी… मजबूत शरीरयष्टी… अन् डोक्याला ठेवलेली शेंडी… लागलीच फेसबुक ला खुपसे पाटलांचे अकाऊंट चाळलं अन् तिथं सुद्धा मला प्रती बच्चु कडु दिसले.
सेम… सेम सगळं… अगदी तीच कामाची पद्धत. अन् त्याच आठवड्यात दैनिक_पुण्यनगरी मधील साप्ताहिक पुरवणी असणाऱ्या राजरंग मध्ये “बच्चु भाऊंचा प्रहार सत्ताधारी अन् विरोधकांना ठरतोय कडु” या मथळ्याखाली आर्टिकल लिहलं. सोलापूर जिल्ह्यात बच्चु कडु व अतुल खुपसे यांचं विशेष लिहणारं माझं पहिलं आर्टिकल होतं. दुपारच्या वेळी खुपसे-पाटलांचा फोन आला. धन्यवाद देण्यासाठी. पण त्यांनी त्यावेळी मला अधोरेखित केलं, आवर्जून सांगितलं की मी फक्त बच्चु कडुंचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे plzz मला त्यांच्या उंचीला आणुन ठेवु नका. खरंच, असं सांगणारा पहिला समाजकारणी/राजकारणी पाहिला होता मी. पुढे पुढे संपर्क वाढला, त्यांच्या कामाची व्याप्ती पाहिली, काम पाहिलं, एके दिवशी म्हणजे १ ऑगस्ट २०१७ रोजी करमाळा तालुक्यातील दिव्हेगव्हाण येथे शाखेचं उद्घाटन बच्चु भाऊंच्या हस्ते होतं.
तिथं बच्चु भाऊंसोबत प्रवास अन् माझ्या आयुष्यातील पहिली Live मुलाखत ठरली. म्हणजे यापूर्वी मंत्री, खासदार, आमदार यांच्या चर्चा, संबंध, प्रवास वगैरे आले. पण कुणाची मुलाखत घेण्याची कधीच इच्छा झाली नाही. तर दिव्हेगव्हाण येथे बच्चु भाऊंनी जाहीर सभेत सांगितलं होतं. माझ्यासारखे अजुन ५-१० बच्चु कडु विधानभवनात गेले तर नक्कीच जनतेचा फायदा होईल. आणि अतुलभाऊंचं कार्य नक्कीच त्या दिशेनं दौडत होतं. लोकं त्यांना प्रती बच्चु कडु म्हणून पाहुल लागली (स्वाभिमानी अन् इमानदार लोकं हे इथं उल्लेखनीय) दिवसेंदिवस प्रहार चं पश्चिम महाराष्ट्रात जाळं वाढत गेलं. शाखा, संघटना, कामं, आंदोलन अशी कितीतरी कामं त्यांच्या माध्यमातून होत गेली. अनेक लोकांना वेगवेगळी पदे देवुन डायरेक्ट बच्चु भाऊंशी जोडण्याचे काम त्यांनी केले. अधिकाऱ्यांना फोन लावुन “मी बच्चु भाऊंचा कार्यकर्ता बोलतोय, प्रहार चा कार्यकर्ता आहे” यापुढे त्यांनी कधी आपली ओळखच निर्माण केली नाही.
दुर्दैवाने आज ते प्रहार मध्ये नाहीत. ज्या लोकांना पदं देवुन मोठ्ठ केलं त्याच लोकांनी अतुल भाऊंच्या पाठीत खंजीर खुपसला. बच्चु भाऊंजवळ सगळं खोटंनाटं चित्र तयार केलं. बच्चु भाऊंच्या प्रहार मध्ये अनेक अनाजी पंत जन्माला आले. खरं तरं अतुल खुपसे-पाटलांचा जेव्हा पासुन संपर्क आला तेव्हापासून ते स्वच्छ चरित्राचे आहेत आणि दिसतात. त्यांच्यावर जुण्या काळात कोणते गुन्हे दाखल आहेत माहित नाही. किंवा सध्या लोकसभा निवडणुकीमध्ये षडयंत्र रचुन व्यावसायिक कारणामुळे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, जे की गेले दहा-बारा वर्ष आणि प्रहारचे काम करत असताना तीन वर्षात याचा कोणता संबंध नव्हता. आणि हाच धागा बच्चु कडुंनी पकडला ही सगळ्यात मोठी दुर्दवाची बाब म्हणावी लागेल. खरं तरं “लढ वाघा” म्हणून जिथं प्रेरणा, प्रोत्साहन द्यायला हवे होते तिथंच हात हातातुन सोडला. अतुल खुपसे-पाटील म्हणजे मला कोणत्याच मोर्चात, आंदोलनात कोणतीच तडजोड दिसली नाही अन् दिसली ती सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या हिताचीच.
पक्षातुन निलंबनाची कारवाई कोअर कमिटी ने अहवाल सादर करत केली म्हणे, कुठली दळभद्री लोकं आली होती ओ चौकशी करायला..? टेंभुर्णी-माढा पोलीस स्टेशन मध्ये ९ फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचा अहवाला दिला. अरे बांडगुळांनो आंदोलनाच्या व्यतिरिक्त एक तरी गुन्हा दाखल आहे का..? बरं त्या संबंधित लोकांना अन् तुमच्या नजरेतल्या गुन्हेगाराला बसवलं का तुम्ही चर्चेला, पाहिली का कोणती कागदपत्रे..? अरे प्रहार म्हणजे तमाम महाराष्ट्रातील एक सत्यवादी संघटना म्हणून महाराष्ट्रातील जनतेचं आशास्थान आहे. आणि अशा भोगस कारवाया करुन स्वाभिमानी जनतेची मान शरमेने खाली घातली तुम्ही. मुळातच ज्या ज्या लोकांनी हे सगळं षडयंत्र रचलं, यातील अनेक लोकांना अतुलभाऊंनी पदं देवुन बच्चु कडुंशी त्यांना जोडले हे वास्तव कुणीच नाकारु शकत नाही आणि अशा नुसतंच बिनकामाची पदं मिरवणाऱ्या लोकांचे बच्चु कडुंनी ऐकलं ही खेदजनक बाब आहे.
असो, कोंबडं झाकलं म्हणून सुर्य उगवायचा राहत नसतो. त्यामुळे काम करणाऱ्या लोकांना कोणत्या पदाची अपेक्षा नसतेच. तानाजी, येसाजी, बाजी, मुरारबाजी हे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी लढत होते. मात्र महाराजांनी कधी अनाजी पंतांवर विश्वास ठेवला नाही अन् यांनी ज्या कामगिरी केल्यात त्यासुद्धा शिवाजी महाराजांनी मोठ्या मनाने गौरविल्या आहेत. मावळा मोठा होईल अन् दुसरा छत्रपती तयार होईल असला विचार सुद्धा कधी मनामध्ये आला नाही राजांच्या. त्यामुळे अतुल भाऊंचे कार्य #अतुल_नीय होतं, आहे आणि राहिल.
– तर अशा या कर्तबगार, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सतत झगडणार्या, बच्चु कडुंनी अन्याय करुन देखील त्यांनाच आदर्श मानणारा, रणझुंजार नेता, दिलदार मित्र, जिवलग भाऊ असणारा अतुल खुपसे-पाटील यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना अनेक शुभेच्छा..! त्यांच्याकडुन सतत जनतेची सेवा घडो. आज आमदार बच्चु कडु एकटेच विधानसभेत आवाज उठवितात. भविष्यात आपण त्यांनाच आदर्श मानुन दिनदुबळ्या, रंजल्या गांजल्या, अंध, अपंग, विधवा, निराधार लोकांचे प्रश्न विधानसभेत उठवावे ह्याच सदिच्छा अन् शुभेच्छा दाटला अंधार दुख:चा तरी सुर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री