Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या महापुरुषांच्या विचारांचा जागर आवश्यक – न्यायाधीश अनुश्री फंड तालुका विधी सेवा...

महापुरुषांच्या विचारांचा जागर आवश्यक – न्यायाधीश अनुश्री फंड तालुका विधी सेवा समिती,वकील संघ जामखेड यांच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

0
406

जामखेड न्युज—–

महापुरुषांच्या विचारांचा जागर आवश्यक – न्यायाधीश अनुश्री फंड

तालुका विधी सेवा समिती,वकील संघ जामखेड यांच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

महापुरुषांचे विचार खुपच अनमोल असतात जीवनात प्रगती करण्यासाठी त्यांच्या विचारांचा जागर आवश्यक आहे असे मत न्यायाधीश अनुश्री फंड यांनी व्यक्त केले. जामखेड न्यायालयात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

जामखेड कोर्ट नवीन इमारतीत तालुका विधी सेवा समिती,वकील संघ जामखेड, यांचे तर्फे आयोजित महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी कार्यक्रमात सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती.अनुश्री फंड मॅडम यांचे हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांचे पुण्यतिथी दिनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळ न्यायाधीश यांनी महापुरुषांच्या सामाजिक कार्याची माहिती देत.महापुरुषांचे सामजिक कार्य आणि त्यांचे विचार प्रेरणादायी असतात. आपण त्यांचे विचारांचा जागर म्हणून जयंती व पुण्यतिथी चे कार्यक्रमात स्मरण आणि अभिवादन केले पाहिजे.

असे सांगितले.या वेळी वकील संघाचे माजी अध्यक्ष अँड संग्राम पोले, वकील संघाचे सचिव अँड अक्षय वाळूंजकर, अँड. गणेश पाटील, अँड.पोपट कात्रजकर, अँड.प्रवीण ससाणे, अँड कुंभार, अँड नितीन घुमरे, अँड शिवाजी लटपटे, अँड. पप्पू थोरात , अँड, विशाल वारे याशिवाय वकील संघाचे इतर सदस्य, कर्मचारी, पक्षकार उपस्थित होते.

वर्षभर शासन निर्णीत तिथीनुसार तालुका विधी सेवा समिती,वकील संघ , यांचे तर्फे आयोजित महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित केले जातात.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!