Wednesday, May 13, 2026
Home ताज्या बातम्या माजी सैनिकांच्या घरात चोरी – हजारो रूपयांचा ऐवज लंपास

माजी सैनिकांच्या घरात चोरी – हजारो रूपयांचा ऐवज लंपास

0
257
जामखेड प्रतिनिधी
           जामखेड न्युज – – ( सुदाम वराट)
  शहरातील शिक्षक काॅलनीतील अंगद जालिंदर कोल्हे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी कपाटातील सामानाची उचकापाचक करून सुमारे अडुसष्ट हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला अशी फिर्याद कोल्हे यांनी जामखेड पोलिस स्टेशनला दाखल केली आहे.
         फिर्यादी  अंगद जालिंदर कोल्हे वय 34 वर्षे धंदा माजी सैनिक रा. कोल्हेवाडी हल्ली रा. शिक्षक कॉलनी जामखेड ता. जामखेड  याच्या घराचे कुलूप तोडून
दिनांक 5/06/2021रोजी रात्री 8/00 वा ते दिनांक 06/08/2021रोजी सकाळी 07/30 वा. सुमारास दि.06/08/2021 रोजी 19/51 वा.कोणीतरी अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटाचे सामानाची उसका पाचक करून  68, 000/- रु.किं  किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला आहे. वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून गुन्हा र.जि .दाखल केला आहे.
         या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किरण कोळपे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!