Tuesday, March 3, 2026
Home ताज्या बातम्या संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त साकत येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण राम...

संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त साकत येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण राम मुरूमकर यांनी वृक्षारोपण व संवर्धनातून स्मशानभूमीचा केला कायापालट

0
604

जामखेड न्युज—–

संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त साकत येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण

राम मुरूमकर यांनी वृक्षारोपण व संवर्धनातून स्मशानभूमीचा केला कायापालट

 

साकत येथे सेवानिवृत्त वन कर्मचारी राम मुरूमकर यांनी स्मशानभूमीत शेकडो झाडे लावून त्यांचे संवर्धन केले तसेच लोकसहभागातून संरक्षणासाठी कंपाऊंड केले यामुळे स्मशानभूमीचा कायापालट
केला आहे. रामभाऊ मुरूमकर व श्री साकेश्वर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी स्मशानभूमीत संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण करण्यात येते. आजही वृक्षारोपण करण्यात आले.

स्मशानभूमीत वृक्षारोपण करताना श्री साकेश्वर विद्यालयातील विद्यार्थी, स्मशानभूमीचा कायापालट करणारे अवलिया रामभाऊ मुरूमकर, मुख्याध्यापक दत्ता काळे, ज्ञानदेव मुरूमकर, डॉ. अजय वराट, माजी सरपंच सदाशिव वराट, सुदाम वराट, प्रसाद होशिंग, अतुल दळवी आदी उपस्थित होते.

दरवर्षी 1 जानेवारी रोजी वृक्षाचा वाढदिवस साजरा करण्यात येतो याच बरोबर नवीन वृक्षारोपण करण्यात येते.

साकत येथील सामाजिक कार्यकर्ते राम मुरूमकर यांनी स्वतः च्या सेवानिवृत्ती निमित्त साकत येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण केले. तसेच या झाडांची स्वतः काळजी घेत दरवर्षी वाढदिवस व विविध सण समारंभ यानिमित्त वृक्षारोपण करतात. यामुळे स्मशानभूमी हरित झाली आहे.

आज स्मशानभूमी परिसरात सुमारे सातशे लहान मोठे झाडे झालेली आहेत. तसेच स्मशानभूमीची सुधारणा करण्याची संकल्पना भावकीपुढे ठेवली याला निस्वार्थी पणे करत असलेल्या कामाला खुप छान प्रतिसाद मिळाला आणि भावकीतून सुमारे पाच लाख रुपये लोकवर्गणी करून स्मशानभूमीचा कायापालट केला. स्मशानभूमीला तार कंपाऊंड केले व आतमध्ये वृक्षारोपण केले.

दलित वस्ती स्मशानभूमीचे काम हाती घेऊन तेथील लोकांचे मतपरिवर्तन करत याही स्मशानभूमीचा कायापालट केला कंपाऊंड करून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे.

राम मुरूमकर स्मशानभूमीचा कायापालट करणारे अवलिया

राम मुरूमकर हे जानेवारी 21 मध्ये वनविभागातून सेवानिवृत्त झाले आणि त्याच दिवशी गावात वृक्षारोपण व स्मशानभूमीचा कायापालट करण्याचा संकल्प केला यानुसार पाच लाख रुपये लोकसहभाग गोळा केला यातून कंपाऊंड तसेच परिसरात वड, पिंपळ, चिंच, आंबा, फुलझाडे लावली. या स्मशानभूमीचा कायापालट तर झालाच दलित वस्ती येथे असलेल्या स्मशानभूमीचा कायापालट केला यामुळे स्मशानभूमीचा कायापालट करणारा अवलिया राम मुरूमकर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!