रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे डॉ. सुहास सुर्यवंशी यांच्या संस्थेविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु बनावट कागदपत्रे, कागदोपत्री विद्यार्थी, शिष्यवृत्ती व महात्मा फुले जीवनदायी योजनेतही मोठा झोल

0
610

जामखेड न्युज—–

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे डॉ. सुहास सुर्यवंशी यांच्या संस्थेविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु

बनावट कागदपत्रे, कागदोपत्री विद्यार्थी, शिष्यवृत्ती व महात्मा फुले जीवनदायी योजनेतही मोठा झोल

 

जामखेड तालुक्यातील डॉ.सुहास बिभीषण सूर्यवंशी व डॉ.पल्लवी सुहास सूर्यवंशी यांनी चेतना सेवा संस्था लातूर या संस्थेमार्फत साकत तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे नर्सिंग,फार्मसी व पॉलिटेक्निक या चारही कॉलेजसाठी एकच इमारत व तीच जमीन दाखवून कॉलेजला मंजुरी मिळविताना खोटे व बनावट कागदपत्र तसेच कागदोपत्री कर्मचारी दाखवून तपासणी कमिटीला मोठ्या प्रमाणावर लाच देऊन शासनाची फसवणूक करून एकाच इमारतीत वेगवेगळ्या कॉलेजला मंजुरी मिळविलेल्या आहेत. तसेच विध्यार्थ्यांना फक्त कागदोपत्री प्रवेश देऊन त्यांची शिष्यवृत्ती लाटण्याचा कार्यक्रम चालू आहे. तेव्हा डॉ सुहास सुर्यवंशी व डॉ पल्लवी सुर्यवंशी यांच्यावर गुन्हे दाखल करून संस्थेची मान्यता रद्द करून प्रवेशित विद्यार्थ्यांचे इतर काॅलेज मध्ये स्थलांतर करावे या मागणीसाठी अहिल्यानगर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, शहराध्यक्ष किरण दाभाडे, नगर जिल्हा सरचिटणीस विजय भांबळ, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आरती बेडेकर, गणेश कदम, विवेक भिंगारदिवे, राहुल कांबळे, अविनाश भोसले, योगेश त्रिभुवन, माया जाधव, बंटी गायकवाड, प्रमोद घोडके, कृपाल भिंगारदिवे, जयराम आगे, शीतल घोडके, यशराज शिंदे, अमोल उजागरे, सुदाम भिंगारदिवे, सोनू ठोंबे, बाळासाहेब शिंदे, सतिश साळवे, सुजित धनवे, रूक्साना पठाण, शिवाजी साळवे युवराज गायकवाड, बापू जावळे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत.

चेतना सेवा संस्था लातूर या संस्थेमार्फत साकत तालुका जामखेड जिल्हा अ.नगर येथे नर्सिंग,फार्मसी व पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये एकही शिक्षक उपलब्ध नसून फक्त तपासणीच्या वेळी कागदोपत्री शिक्षक दाखविले जातात. त्यामुळे डॉ.सुहास बिभीषण सूर्यवंशी व डॉ.पल्लवी सुहास सूर्यवंशी यांच्यासह चेतना सेवा संस्था लातूरचे सर्व पदाधिकारी व कागदोपत्री काम करणारे सर्व कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत म्हणून आमरण उपोषण सुरु झाले आहे.

निवेदनात म्हटले आहे की चेतना सेवा संस्था लातूर या संस्थेमार्फत साकत तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे एकाच इमारतीत एएनएम/जीएनएम, बी.एस्सी नर्सिंग,डी.फार्मसी तसेच पॉलिटेक्निक कॉलेज चालविले जात असून शासनाच्या व विद्यापीठाच्या नियमांचे पूर्णपणे उल्लंघन केलेले आहे. कॉलेजसाठी लागणारा कर्मचारी वर्ग हा कागदोपत्री आहे.

प्रत्येक कॉलेजसाठी दाखविलेले ‘प्राचार्य’ हे सुद्धा त्यापदासाठी पात्र नसून त्यांचे खोटे व बनावट कागदपत्र व प्रतिज्ञापत्र तयार करून वेगवेगळ्या तपासणी समित्यांना मोठ्या प्रमाणावर लाच देऊन डॉ.सुहास बिभीषण सूर्यवंशी व डॉ.पल्लवी सुहास सूर्यवंशी व संबंधित कागदोपत्री काम करणाऱ्या प्राचार्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे संबंधित विद्यापीठामार्फत सर्व कॉलेजच्या एकाच दिवशी तपासण्या करून कॉलेज व संस्थेचे विश्वस्थ यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या प्रवेश प्रक्रियेत संस्थेच्या कोणत्याही अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात येऊ नये. तसेच मागील शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांचे तात्काळ इतर कॉलेजला समायोजन करून स्थलांतर करण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी केली आहे.

संस्थेमार्फत साकत तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथे एकाच इमारतीत अवैधरित्या चालविले जाणारे कॉलेज १) डॉ.पल्लवी एस सूर्यवंशी कॉलेज ऑफ नर्सिंग(बी एस्सी) साकत तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर(कॉलेज कोड ९४४०),२) डॉ. पल्लवी एस सूर्यवंशी कॉलेज ऑफ नर्सिंग(जीएनए) साकत तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर(कॉलेज कोड १६०५),३) इंदिरा इन्स्टिटयूट कॉलेज ऑफ फार्मसी साकत तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर(कॉलेज कोड ०५६५६),४) इंदिरा पॉलिटेक्निक कॉलेज साकत तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर.

विद्यार्थी हित,शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता तसेच समाजहित डोळ्यासमोर ठेऊन तालुका न्याय दंडाधिकारी म्हणून आदेश देऊन डॉ.सुहास बिभीषण सूर्यवंशी व डॉ.पल्लवी सुहास सूर्यवंशी यांच्यासह चेतना सेवा संस्था लातूरचे सर्व पदाधिकारी व कागदोपत्री काम करणारे सर्व कर्मचारी यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, संस्थेमार्फत एकाच इमारतीत एएनएम,जीएनएम,बी.एस्सी नर्सिंग,डी. फार्मसी तसेच पॉलिटेक्निक कॉलेजच्या एकाच दिवशी संबंधित विद्यापीठामार्फत तपासण्या करून कारवाई करून कॉलेजची शासन मान्यता व विद्यापीठाचे संलग्नीकरण रद्द करण्यात यावे व तो पर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांचे इतर कॉलेजला स्थलांतर करण्यात यावे. तसेच डॉ.सुहास बिभीषण सूर्यवंशी व डॉ.पल्लवी सुहास सूर्यवंशी यांच्यासह चेतना सेवा संस्था लातूरचे सर्व पदाधिकारी व कागदोपत्री काम करणारे सर्व कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उपोषण सुरु झाले आहे.

“डॉ.सुहास बिभीषण सूर्यवंशी व डॉ.पल्लवी सुहास सूर्यवंशी यांनी इंदिरा हॉस्पिटल जामखेड येथे शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी योजनेत देखील करोडो रुपयांचा घोटाळा केला आहे. त्या भ्रष्टचाराच्या माध्यमातून गोळा केलेल्या पैशातून साकत तालुका जामखेड जिल्हा अ.नगर येथे चेतना सेवाभावी संस्था लातूर या संस्थेच्या माध्यमातून अवैध संपत्ती घेतली आहे. डॉ.सुहास बिभीषण सूर्यवंशी व डॉ.पल्लवी सुहास सूर्यवंशी यांनी शासनाची फसवणूक करून बनावट कागदपत्रांच्या आधारे एकाच इमारतीत अनेक कॉलेजला मंजुरी घेऊन शासनाची फसवणूक केली आहे. डॉ.सुहास बिभीषण सूर्यवंशी व डॉ.पल्लवी सुहास सूर्यवंशी यांनी शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी योजनेत केलेल्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून निर्माण केलेल्या मालमत्ता शासन जमा करण्यात यावी अशी मागणीही श्री. सुनील साळवे यांनी केली आहे”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here