लिंगायत समाजाची स्मशानभूमी उजळली सौर दिव्यांनी शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे यांच्या मागणीला यश

0
375

जामखेड न्युज—–

लिंगायत समाजाची स्मशानभूमी उजळली सौर दिव्यांनी

शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे यांच्या मागणीला यश

जामखेड शहरातील लिंगायत समाजाची स्मशानभूमी अनेक दिवसांपासून अंधारात होती याठिकाणी लाईटची मागणी शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे यांनी केली होती त्यानुसार त्या ठिकाणी सौर लाईट बसविण्यात आल्या मुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे.

जामखेड शहरात लिंगायत समाजाचे कमीत कमी १५० ते २०० घरे आहेत. शिवकुमार डोंगरे हे अध्यक्ष असताना लिंगायत समाजाचे अध्यक्ष असताना स्मशानभूमीसाठी निधी व शहरात मंगल कार्यालयासाठी निधी आणला होता. आता स्मशानभूमी परिसरात सौर लाईट बसवण्यासाठी प्रयत्न केले व स्मशानभूमी सौर दिव्यांनी उजाळली आहे.

विधानसभेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या
यांच्या मार्गदर्शनाने व प्रा. मधुकर राळेभात यांच्या वतीने लिंगायत स्मशानभूमी येथे सौर लाईट बसविण्यात आली त्याचे आज उद्घघाटन प्रा. मधुकर राळेभात भाजपा ज्येष्ठ नेते यांच्या हस्ते करण्यात आले बऱ्याच वर्षापासून लिंगायत स्मशानभूमी मध्ये लाईट नव्हती ती आम्ही मागणी केली या मागणीचे तात्काळ मंजूर करून सौर लाईट बसवली. आमच्या मागणीला प्रा. मधुकर राळेभात यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ताबडतोब मागणी मान्य केली.

लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीत सौर लाईट बसवण्यात आली याबाबत समाजाच्या वतीने प्रा मधुकर राळेभात यांचे आभार मानले.

यावेळी समाजाची तळमळ असणारे शिवा संघटना जिल्हा उपाध्यक्ष तथा लिंगायत समाजाचे माजी अध्यक्ष शिवकुमार डोंगरे , शिवा संघटना शहर अध्यक्ष जगदीश मेनकुदळे , महेश नगरे , उप्पाध्यक्ष राहुल लोहकरे , अमरनाथ डोंगरे , पिंटू गुळवे, नाना राजुरकर , सोमा शिलवंत , नगरसेवक अमित जाधव, नगरसेवक मोहन पवार , सलीम भाई तांबोळी , प्रा राऊत सर , विनोद जंगम , आदी समाज बांधव व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शिवा संघटना जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे यांनी समाजाच्या स्मशानभूमी साठी सौर लाईट दिल्याबद्दल विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व भाजपा ज्येष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here