विधानसभेप्रमानेच स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेनेला घवघवीत यश मिळणार – शिवसेना सहसचिव एकनाथ शेलार
शिवसेना तालुकाप्रमुख प्रा कैलास माने यांच्या वतीने जामखेडमध्ये शेलार यांचे जंगी स्वागत
राज्यातील जनतेचा शिवसेनेवर विश्वास आहे. यामुळे संपूर्ण राज्यात शिवसेनेसाठी चांगले वातावरण आहे. विधानसभेप्रमानेच स्थानिक स्वराज्य संस्थेत पक्षाला घवघवीत यश मिळेल त्या दृष्टीने पक्षाने चांगली तयारी केली आहे असे मत शिवसेना सहसचिव एकनाथ शेलार यांनी व्यक्त केले.
शिवसेना सहसचिव महाराष्ट्र राज्य एकनाथ शेलार यांनी जामखेड येथे शिवसेना तालुकाप्रमुख प्रा कैलास माने यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते. यावेळी यावेळी शिवसेना सहसचिव महाराष्ट्र राज्य एकनाथ शेलार, शिवसेना नेते सुनील पाटील ठाणे,शिवसेना तालुकाप्रमुख कैलास माने, शिवसेना शहरप्रमुख देविदास भादलकर, दलित आघाडी तालुका उपप्रमुख पांडुरंग समुद्र, कपिल माने, अभिजीत माने, आरिफ शेख, प्रमोद गव्हाळे, बाबासाहेब कोल्हे, बाळासाहेब साळवे, रोहित राजगुरू, अजय माने, सतीश शिरगिरे, बाबासाहेब कांबळे, संयम हजारे, दादा घुगे, नाना गव्हाळे, सोमनाथ पवार, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, राज्यात होणाऱ्या आगामी सर्व निवडणुकीची शिवसेना पक्षाने जय्यत तयारी केली आहे.
विधानसभेला जसे शिवसेनेला भरभरून मतदान झाले तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेत होईल सर्व लाडक्या बहिणी आपल्या बरोबर आहेत. असेही शेलार यांनी सांगितले.
शिवसेना कार्यालयात शेलार यांचा सत्कार करताना तालुकाप्रमुख प्रा कैलास माने म्हणाले की, शिवसेना पक्षाचे शहरासह ग्रामीण भागात चांगले वातावरण आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
जामखेड शहराच्या नागेश्वराच्या पावन भूमीमध्ये जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने सहसचिव एकनाथ शेलार यांचे जंगी स्वागत करण्यात आले