जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – -(सुदाम वराट)
कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून घेतलेल्या नेत्र तपासणी शिबिरात नेत्रदोष आढळलेल्या
कर्जत-जामखेड मतदारसंघातील विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या बॅचला शस्त्रक्रिया करण्यासाठी पुण्यातील एच.व्ही.देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेची भीती वाटू नये आणि मानसिक बळ मिळावं यासाठी आमदार रोहित पवारांच्या पत्नी कुंती पवार यांनी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची भेट घेतली. विद्यार्थी व पालकांना मानसिक आधार दिला यावेळी हॉस्पिटलचे चीफ मेडिकल डायरेक्टर डॉ. कर्नल(नि) मदन देशपांडे यांच्यासह इतर डॉक्टर आणि कर्मचारी देखील उपस्थित होते.
आमदार रोहित पवार हे जरी राजकारणात असले तरी एक सामाजिक बांधिलकी म्हणून राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त भर देतात. वडिल राजेंद्र पवार हे शेती क्षेत्रात विविध प्रयोग करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळेल यासाठी प्रयत्न करत आसतात बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध बियाणांच्या वाणाचे वितरण केलेले आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.
आई सुनंदाताई पवार यांनी तर कर्जत-जामखेड मधील मुली व महिलांच्या आरोग्यविषयक प्रश्नांसाठी काम करत आहेत तसेच स्वच्छतेसाठी लोकांमधे जनजागृती करत आहेत. अनेक मुली व महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
आमदार रोहित पवार यांच्या आई वडिलांप्रमाणे आता पत्नी कुंती पवार या देखील समाजकारण करत आहेत. याचाच एक भाग म्हणून हाॅस्पिटल मधील मुलांना भेटून त्यांना मानसिक आधार दिला यामुळे मुले व पालकांना आनंद तर झालाच पण आपली काळजी घेण्यासाठी अख्खे पवार कुटुंब आहे हा आधार मिळाला