गुजरातमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. अहमदाबादवरून लंडनला जाणारे प्रवासी विमान कोसळले आहे. हे विमान एअर इंडियाचे प्रवासी विमान आहे. या विमानातून २४२ प्रवासी प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. हे विमान रहिवाशी भागात कोसळले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सविस्तर माहिती घेतली आहे. तसेच घटनास्थळी सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन त्यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या घटनेची माहिती घेतली. तसेच त्यांनी अमित शहा यांना तातडीने अहमदाबादला जाण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वाचाच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक AI171 या विमानाने 12 जून रोजी दुपारी 1 वाजून 39 मिनिटांनी (IST) अहमदाबादहून उड्डाण घेतले. एडीएस-बी (ADS-B) डेटानुसार, या विमानाने 625 फूट बॅरोमेट्रिक उंची गाठली होती. त्यावेळी त्याची गती 174 नॉट्स (KTS) होती. मात्र, यानंतर काही क्षणांतच विमान 475 फूट प्रति मिनिट वेगाने खाली उतरु लागले. हे विमान खाली येताच मोठा स्फोट झाला आणि ते विमान कोसळले.
अहमदाबाद – लंडन AI171 विमानाने 1.17 मिनिटाने उड्डाण केले मात्र काही मिनिट्समध्येच हे विमान क्रॅश झाले एअरपोर्टवर सर्व बाजूने धुरांचे लोट दिसून येत आहेत विमानात २४२ प्रवासी असल्याची शक्यता तसंच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी असण्याची शक्यता आपात्कालीन सेवेला सुरूवात मेडिकल टीम बचावकार्यासाठी पोहचली आहे.
गृहमंत्री अमित शहांनी घेतली माहिती
लोक रस्ता मोकळा करण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले. अपघाताची माहिती मिळताच गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि पोलिस आयुक्तांशी चर्चा केली आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री अहमदाबादला रवाना झाले आहेत. अपघाताच्या वेळी विमानात २२० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स उपस्थित होते. एअर इंडियाचे हे विमान अहमदाबादच्या रहिवासी भागात कोसळले आहे.
सोशल मीडियावर हृदयद्रावक व्हिडिओ
गेल्या काही तासांपासून अपघाताशी संबंधित व्हिडिओ आता समोर येत आहेत आणि हे व्हिडिओ खूपच भयानक आहेत. या व्हिडिओमध्ये फक्त ज्वाला आणि धूर दिसत आहे. अपघातानंतर बचाव कार्य सुरू आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात येत आहे. यादरम्यान, काही जखमींना व्हीलचेअरवर तर काहींना स्ट्रेचरवर नेताना दिसले आहे आणि या घटनेचे व्हिडिओही वेगाने व्हायरल होत आहेत. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळाभोवती मोठी गर्दी जमली असल्याचेही दिसून आले आहे.
विमानात किती प्रवासी होते?
अहमदाबाद-लंडन हे प्रवासी विमान कोसळले आहे. उड्डाण केल्या केल्या ७ मिनिटांमध्ये हे विमान कोसळले आहे. दरम्यान ३०० प्रवासी क्षमता असलेल्या या विमानातून २४२ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती समोर येत आहे.