जामखेड न्युज—–
ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय वडे यांची दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल पत्रकारांच्या वतीने सत्कार
जामखेड तालुक्यातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या संचालक पदी ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय वडे यांची नियुक्ती झाल्यावर जामखेड तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने वडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव शशिकांत देशमुख, पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी मोहदीन तांबोळी, सामना तालुका प्रतिनिधी सुदाम वराट, रोखठोक न्यूजचे संपादक अविनाश बोधले, हॅलो अहिल्यानगरचे संपादक अशोक वीर, तुकाराम अंदुरे, दत्तात्रय पवार, जामखेड एक्सप्रेसचे पप्पूभाई सय्यद, किरण रेडे, पांडुरंग माने, साहिल भैय्या तांबोळी उपस्थित होते.
गेल्या ७५ वर्षाच्या इतिहासात प्रथमच या संस्थेची निवडणूक कोर्टाच्या आदेशानुसार गुरुवारी दि (५) जून पार पडली यामधे बहुमताने उध्दव देशमुख, शशिकांत देशमुख व अरुण चिंतामणी यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने विजय संपादन केला.