दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत उद्धव देशमुख, अरुण चिंतामणी व शशिकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा निर्विवाद विजय

0
529

जामखेड न्युज——-

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत उद्धव देशमुख, अरुण चिंतामणी व शशिकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा निर्विवाद विजय

जामखेड येथील दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीची पंच्याहत्तर वर्षीच्या इतिहासात प्रथमच मतदान पध्दतीने निवडणूक झाली आहे या निवडणुकीत उद्धव देशमुख, अरुण चिंतामणी व शशिकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा निर्विवाद विजय झाला, तर दिलीप बाफना व प्रविण देशपांडे यांना १७ पैकी केवळ अवघी दोन मते मिळाली.

जामखेड येथील दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी शिक्षण शेत्रातील नावाजलेली संस्था असून पंच्याहत्तर वर्षीच्या इतिहासात प्रथमच या संस्थेची आज दि पाच रोजी निवडणूक कोर्टाच्या आदेशानुसार पार पाडली. या निवडणुकीत जुणे एकुण सभासद ५१ होते यातील १७ सभासदांनी मतदान केले. त्यापैकी देशमुख-चिंतामणी गटाला १५ तर दिलीप बाफना व प्रविण देशपांडे यांना अवघी दोन मते मिळाली.

तसेच हायकोर्टाच्या आदेशानुसार वादग्रस्त असणाऱ्या १७९ सभासदांचे स्वतंत्र मतपेटीत मतदान घेण्यात यावे, या सभासदांना फक्त मतदान करता येईल, निवडणुकीस उभे राहता येणार नाही तसेच त्यांनी सभासद असल्याचे योग्य त्या न्यायालयात सिद्ध झाल्यानंतरच या मतपेटीतील मतदान मोजण्यात यावे असा आदेश दिला आहे. सदर १७९ पैकी ६२ मतदारांनी मतदान केले आहे, मात्र सदर मतपेटीतील मतदान न मोजता मतपेटी सिल करुन धर्मदाय आयुक्त कार्यालय ठेवण्यात येणार आहे.

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेसंदर्भात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरु होते, संस्थेचे अध्यक्ष उद्धव देशमुख यांच्या मतानुसार विरोधी गटाने खोटे सभासद रजिस्टर व बनावट कागदपत्रे तयार करुन त्या माध्यमातून संस्थेवर ताबा मिळविण्याचे शडयंत्र रचले होते, मात्र य निकालामुळे त्यावर पाणी पेरले असल्याचे देशमुख म्हणाले.

त्यामुळे जुन्या ५१ पैकी १७ मतदारांनी जे मतदान केले त्यातून निवडणूक प्रक्रिया पार पडली या मध्ये सत्ताधारी गटाचे १३ पैकी ११ संचालकांना प्रत्येकी १५ मते मिळाली त
विरोधी गटाचे दिलीप बाफना यांना अवघी दोन मते मिळली. बाफना गटाच्या दोन्ही उमेदवारांचा दारुण पराभव झाला.

त्यामुळे संस्था पुन्हा जुन्याच सत्ताधारी देशमुख-चिंतामणी गटाच्या ताब्यात राहणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे, सदर निवडणूकीत निवडुन आलेले संचालक खालील प्रमाणे

उध्दव देशमुख, अरूण चिंतामणी,
दिलीप गुगळे, डॉ प्रताप गायकवाड, डॉ सुनिल कटारिया, जेष्ठ पत्रकार दत्तात्रेय वडे, शरद देशमुख, दिपक होशिंग, शिवाजी कासार, रामनाथ परदेशी, दिलीप चौकटे हे आकरा संचालक प्रत्येकी १७ पैकी १५ घेऊन विजयी झाले आहेत तर विरोधी जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाफना व प्रवीण (बापू) देशपांडे या दोघांना अवघी दोनच मते मिळाली आहेत त्यामुळे हे दोघे पराभूत झाले आहेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरिक्षक उमाकांत ढोले यांनी काम पाहिले तर उमाकांत फड, निवृत्ती बिराजदार, नितीन मोहरकर यांनी त्यांना सदर कामकाज पार पाडण्यासाठी मदत केली. निवडणूक अधिकारी व त्यांच्या सहकार्यांनी अतिशय निरपेक्ष, बिनचूक व काटेकोरपणे निवडणूक पार पाडली त्याबद्दल मतदारांनी समाधान व्यक्त केले.

चौकट
खोटे सभासद रजिस्टर व खोटे कागदपत्रे तयार करुन संस्था ताब्यात घेण्याचा विरोधाकांचा डाव फसला असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष उध्दव देशमुख यांनी व्यक्त केले. तर विरोधकांनी दाखवलेले सभासद हे खोटे व बनावट आहेत. ते कधीही आपण सभासद असल्याचे सिद्ध करु शकणार नाहीत त्यामुळे दुसऱ्या पेटीतील मतदान कधीच मोजले जाणार नाही असे मत अरुण चिंतामणी यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here