Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या सभापती प्रा राम शिंदे यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्रिशताब्दी जयंती निमित्त पहाटे अहिल्येश्वराचा...

सभापती प्रा राम शिंदे यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्रिशताब्दी जयंती निमित्त पहाटे अहिल्येश्वराचा सपत्नीक अभिषेक

0
755

जामखेड न्युज—–

सभापती प्रा राम शिंदे यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्रिशताब्दी जयंती निमित्त पहाटे अहिल्येश्वराचा सपत्नीक अभिषेक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या त्रिशताब्दी जयंती निमित्त, आज पहाटे ५.३० वाजता श्री क्षेत्र चोंडी, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर येथे अहिल्येश्वराचा सपत्नीक अभिषेक करून अहिल्यादेवींना वंदन केले.

आजच्या या ऐतिहासिक त्रिशताब्दी जयंती उत्सवाच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा सभापती प्रा राम शिंदे यांच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० जयंती ( त्रिशताब्दी ) दिनांक ३१ मे २०२५ रोजी श्री क्षेत्र चोंडी, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर येथे दुपारी एक वाजता भव्य स्वरूपात साजरी होणार आहे.

या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सभापती प्रा राम शिंदे आहेत कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या सह पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नामदार पंकजा मुंडे, नामदार छगन भुजबळ, नामदार अतुल सावे, नामदार दत्तात्रय भरणे, नामदार जयकुमार गोरे सह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.

चौंडी येथील विकास आराखड्यासाठी 681 कोटींच्या खर्चास मा.उप मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री.अजित पवार यांच्या नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता दिल्याने येत्या तीन वर्षात कामे पूर्ण होऊन श्रीक्षेत्र चौंडी एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन आणि तीर्थक्षेत्र म्हणून नावरुपास येईल.

असा विश्वास जयंती कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी व्यक्त केला मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!