चौंडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त जय्यत तयारी स्वागताध्यक्ष सभापती प्रा राम शिंदे तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार

0
593

जामखेड न्युज—–

चौंडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त जय्यत तयारी

स्वागताध्यक्ष सभापती प्रा राम शिंदे तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० जयंती ( त्रिशताब्दी ) दिनांक ३१ मे २०२५ रोजी श्री क्षेत्र चोंडी, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर येथे भव्य स्वरूपात साजरी होणार आहे.

या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सभापती प्रा राम शिंदे आहेत कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या सह पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नामदार पंकजा मुंडे, नामदार छगन भुजबळ, नामदार अतुल सावे, नामदार दत्तात्रय भरणे, नामदार जयकुमार गोरे सह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.

या ऐतिहासिक जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेऊन प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळाची पाहणी केली.

या वेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, पोलिस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.भरतकुमार बावीस्कर, कार्यकारी अभियंता श्री.लक्ष्मीकांत जाधव यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार गणेश माळी, पोलीस निरीक्षक महेश पाटील आदी उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 31 मे रोजीच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवित आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा न्यायप्रिय राज्यकारभार, प्रजाहितदक्षता, आक्रमकांनी उध्वस्त केलेल्या मंदिरांचे त्यांनी केलेले पुन:निर्माण आणि 18 व्या शतकातील त्यांचे सांस्कृतिक पुनरुत्थानाचे कार्य आपल्याला चिरस्फुर्तीदायी आहे.

चौंडी येथील विकास आराखड्यासाठी 681 कोटींच्या खर्चास मा.उप मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री.अजित पवार यांच्या नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता दिल्याने येत्या तीन वर्षात कामे पूर्ण होऊन श्रीक्षेत्र चौंडी एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन आणि तीर्थक्षेत्र म्हणून नावरुपास येईल, असा विश्वास जयंती कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here