नीरज चोप्राचा ऐतिहासिक थ्रो, पहिल्याच प्रयत्नात आॅलंपीकच्या अंतिम फेरीत धडक

0
280
जामखेड न्युज – – – 
टोकिओ ऑलिम्पिकमधील भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने अंतिम फेरीत धडक मारली आहे. बुधवारी पार पडलेल्या अ गटातील पात्रताफेरीमधील कामगिरीच्या जोरावर नीरजला थेट अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. कामगिरीच्या आधारे ऑटोमॅटिक क्वालिफिकेशनच्या नियमांनुसार थेट अंतिम फेरीत पोहचला आहे.
असा मिळाला नीरजला अंतिम फेरील प्रवेश
पुरुष भालाफेक स्पर्धेमध्ये ८३.५० मीटरपर्यंत भाला फेकणाऱ्या किंवा सर्वोत्तम १२ खेळाडूंना प्रवेश अंतिम फेरीत प्रवेश दिला जातो. मात्र हे उत्तम १२ खेळाडू गट अ आणि ब मधून एकत्रितपणे निवडले जातात. ब गटामधील स्पर्धा अजून बाकी आहे. तसेच अ गटामधील काही स्पर्धकही अजून शिल्लक आहेत. मात्र असं असलं तरी नीरजला या सर्वाची चिंता करण्याची गरज नाही. कारण नीरजने पहिल्या अटीनुसार म्हणजे ८३.५० पेक्षा अधिक लांब भाला फेकत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.
७ ऑगस्टला होणार फायनल सामना
नीरजने पात्रता फेरीमध्ये फेकलेला भाला हा तब्बल ८६.६५ मीटरपर्यंत गेला आणि तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. अ गटामध्ये नीरज १५ व्या स्थानी होता. विशेष म्हणजे नीरजने ही कामगिरी पहिल्याच प्रयत्न केली. फिनलॅण्डच्या लेस्सी इतीलातोलोसुद्धा अशाच प्रकारे अंतिम फेरीमध्ये गेला आहे. ऑलिम्पिक स्टेडियममध्ये ७ ऑगस्ट रोजी पुरुष भालाफेक स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. मंगळवारी भारताच्या अन्नू राणीला पात्रता फेरीमध्ये चांगली कामगिरी करता न आल्याने ती स्पर्धेबाहेर फेकली गेली.
एकाच थ्रोमध्ये केले अनेक रेकॉर्ड
नीरज चोप्रासमोर फायनल्स गाठण्यासाठी 83.5 मीटरचं टार्गेट होतं. परंतु, नीरजनं 86.65 चा थ्रो करत फायनल्समध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे ऑलिम्पकच्या फायनलमध्ये जागा मिळवणारा नीरज भारताचा पहिला खेळाडू बनला आहे. तर ऑलिम्पिक एथलेटिक्स स्पर्धेच्या फायनलमध्ये जागा मिळवणारा 12 वा भारतीय बनला आहे.
स्पर्धेत भारताला आतापर्यंत तीन पदकं
भारताने यंदा आपला ऑलिम्पिकमधील सर्वात मोठा चमू पाठवला असून त्यात १२७ खेळाडूंसह २२८ सदस्यांचा समावेश आहे. भारताला आतापर्यंत यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये तीन पदकं निश्चित झाली आहेत. यामध्ये वेटलिफ्टींगपटू मिराबाई चानूने पटाकवलेलं रौप्य पदक, बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधूच्या कांस्यपदकासहीत भारताची युवा बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने आपलं पदक शुक्रवारी झालेल्या सामन्यामधील विजयासहीत निश्चित केलं आहे. टोक्योमध्ये भारताचे १२७ खेळाडू १८ क्रीडा प्रकारांत सहभागी झालेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here