जामखेड न्युज – – –
मुंबई विमानतळावरील ‘अदानी एअरपोर्ट्स’चे बोर्ड शिवसैनिकांनी फोडले ते योग्यच केलं आहे. मुंबई विमानतळ अदानी ग्रुपवला चालवायला दिलं आहे. त्याची मालकी हक्क कुणाकडेही नाही., असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरच ‘अदानी एअरपोर्ट्स’ असे फलक लावण्यात आले होते. शिवसैनिकांनी सोमवारी हे फलक तोडून टाकले. यावरु राजकीय वांदग सुरु झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर व्यवस्थापनाचा ताबा १३ जुलैला अदानी यांच्या कंपनीला मिळाला. त्यानंतर मुंबई विमानतळाच्या विविध परिसरात अदानी एअरपोर्ट्स असे बोर्ड लावण्यात आले. VIP गेट नंबर ८ असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असो या सर्व ठिकाणी अदानी एअरपोर्ट्स असे बोर्ड लावले होते. सोमवारी शिवसैनिक आणि भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी बोर्ड्स फाडले. यावर राजकीय टीका होत असनाच संजय राऊत यांनी याचं समर्थन केलं आहे.
राहुल गांधीसोबत बैठक -सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बैठक झाल्याचेही संजय राऊत यांनी सांगितलं. या भेटीदरम्यान राहुल गांधी यांच्या मनातील शंका दूर झाल्या आहेत. लवकरच राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. आज राहुल गांधी यांनी विरोधी पक्षातील नेत्यांसाठी ब्रेक फ्रास्ट ठेवला आहे. तिथे आम्ही जाणार आहोत. अनेक मुद्यावर आम्ही एकत्र काम करत आहोत. सरकार संसद चालू देत नाही असं म्हटले जातेय. पण हे चुकीचं आहे. संसद बंद असेल तर त्याचा फटका आम्हाला बसणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आमच्या सुरात सूर मिसळून पेगॉसीसच्या चौकशीची मागणी केली आहे. देशातील विरोधी पक्ष आता कमालीचा एकजूट आहे.
हेही वाचा: सोनं गाठणार प्रति तोळा एक लाखांचा टप्पा; कधी ते जाणून घ्या?