जामखेडमध्ये डे नाईट क्रिकेट स्पर्धेमुळे परिसरातील खेळाडूंना व्यासपीठ मिळाले – प्रा. मधुकर राळेभात सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयकॉन प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन
जामखेडमध्ये डे नाईट क्रिकेट स्पर्धेमुळे परिसरातील खेळाडूंना व्यासपीठ मिळाले – प्रा. मधुकर राळेभात
सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयकॉन प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन
आयकॉन प्रिमीयर लीग क्रिकेटचे डे नाईट सामने परिसरात खेळाडूंना पाहता येणार आहेत यातून नवीन खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. यातून चांगले खेळाडू घडतील. खेळाडूंना स्वतः ला आजमावण्याची संधी मिळणार आहे. आणि हि संधी सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ यांनी उपलब्ध करून दिली आहे. असे मत प्रा. मधुकर राळेभात यांनी व्यक्त केले.
सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयकॉन प्रिमीयर लीग २०२५ पहिल्या पर्वाचे भव्य दिव्य असे दिवसरात्र क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी प्रा. मधुकर राळेभात, अमित चिंतामणी, जानकीमामा गायकवाड, महेश निमोणकर, पवन राळेभात, आकाशशेठ बाफना बिभीषण धनवडे, संजय काशिद, संतोष गव्हाळे, ऋषिकेश गायकवाड, अँड. अमोल जगताप, शामीर सय्यद, मोहन पवार, भरत जगदाळे, हवाशेठ सरनोबत, सनी सदाफुले, अमोल पिसाळ, गणेश काळे, तात्याराम पोकळे, अजय कोल्हे, वीटकर, अनिल बाबर, वसिम सय्यद, संजय डोके, गणेश काळे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. राळेभात म्हणाले की, सध्या उन्हाची तीव्रता खुपच आहे. यामुळे डे नाईट हीआगळीवेगळी क्रिकेट स्पर्धा होईल.
यावेळी बोलताना आयोजक महेश निमोणकर म्हणाले की, निलेशभाऊ च्या डायरीत नाही हा शब्द नाही हे जामखेड तालुक्यातील लोकांनी कोरोना काळात पाहिले. लोकांना पिण्याचे पाणी, औषधे पुरवली त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. समाजासाठी खर्च करण्याची दानत लागले ती भाऊंकडे आहे.
जामखेड तालुक्यातील मातब्बर आठ संघमालकांकडून तब्बल ८० च्या वर खेळाडूंचा यावेळी IPL च्या धर्तीवर लिलाव प्रक्रिया पार पडली होती. ते आठ संघ पुढील प्रमाणे.