‘राज कुंद्राने कुठला चित्रपट…’ नितेश राणेंच्या ‘त्या’ टीकेला अजित पवारांनी दिलं उत्तर

0
421
जामखेड न्युज – – – – 
राज्याला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. पावसामुळे यंदाही कोकणात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली. नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी राजकीय नेतेमंडळींनी आपला मोर्चा कोकणाकडे वळवला. मात्र संकटात सापडलेल्या कोकणवासीयांच्या मदतीसाठी आयोजित पाहणी दौरे एकमेकांवरील राजकीय चिखलफेकीमुळेच जास्त चर्चिले गेले. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यामध्ये उडी घेत मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या नारायण राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिल.
आता यावर आमदार नितेश राणे यांनी टीका केली होती. माध्यमांशी बोलतांना त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे की होती की,’ कोणती भाषा वापरावी हे अजित पवार यांनी सांगणे म्हणजे राज कुंद्राने कुठला चित्रपट बघावा हे सांगण्यासारखे आहे असा टोला त्यांनी लगावला होता. त्यांचा या टीकेवर अजित अजित पवारांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सडेतोड उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले अजित पवार?
‘मी टीकाकारांना किंमत देत नाही…आपल्यावर कोणीही टीका करत मात्र आपल्यावर अवलंबून असतं कोणाला कितपत महत्त्व दयायचे ते, दुसऱ्यांच्या टीकेला मी काहीच किंमत देत नाही’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here