संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी
मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष भैय्या देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. हत्येच्या कृरतेचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. अंगावर काटा फुटेल व फोटो पाहणाऱ्या व्यक्ती च्या डोळ्यात पाणी येईल अशी निर्घृणपणे हत्या झालेली आहे. यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून समस्त जामखेड वाशियांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन जामखेड बंद चे आवाहन करण्यात आले आहे.
समस्त जामखेड करांच्या वतीने तहसीलदार गणेश माळी यांना जामखेड बंद ठेवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे निवेदनावर शिवप्रतिष्ठान चे जामखेड तालुका प्रमुख पांडुरंग भोसले, मंगेश आजबे, प्रदिप टाफरे, हरीभाऊ आजबे, चंद्रशेखर नरसाळे, राजू गोरे, अशोक फोटफोडे, धीरज पाटील यांच्या सह अनेकांच्या सह्या आहेत.
दिलेल्यानिवेदनात म्हटले आहे की. दि.०३/०३/२०२५ रोजी प्रसार माध्यमांवर स्व. संतोष भैय्या देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र व्हायरल झाले आहेत. त्यामुळे समाजमन व्यतीत झाले आहे.
तसेच समाजामध्ये संतापाची तीव्र लाट पसरली आहे तरी या गुन्ह्यातील दोषी व फरार आरोपी यांना अटक करून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून दोषींना फाशीचीच शिक्षा व्हावी याकरिता बुधवार दिनांक ०५/०३/२०२५ रोजी जामखेड तालुका बंदचे आवाहन करण्यात येत आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह व्हिडिओ व फोटो समोर आले आहेत. हे फोटो बघून हैवानाचाही थरकाप उडेल अशा क्रूर पद्धतीने नराधमांनी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे एकूण 15 व्हिडिओ व 8 फोटो सीआयडीच्या हाती आले आहेत. हे व्हिडिओ व फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या मनात संतापाची लाट निर्माण होईल. त्यामुळे आता सरकारने यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून समस्त जामखेड करांच्या वतीने जामखेड बंदचे आवाहन करण्यात आले आहे.