आमदार रोहित पवार थेट ज्वारी काढण्यासाठी शेतात, जाणून घेतले ज्वारी काढण्याचे कष्ट
यावेळी पहा काय म्हणाले आमदार रोहित पवार
दोन दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार जामखेड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना तालुक्यातील विविध गावात दु खद घटना घडलेल्या घरी भेट देत सात्वंवन केले. तसेच देवदैठण येथे ज्वारी काढणी सुरू असलेल्या शेतात भेट देत प्रत्यक्षात ज्वारी काढण्याचा अनुभव घेतला, ज्वारी काढताना माता भगिनी व बांधवांना किती कष्ट पडतात हे जाणून घेतले व शेतकऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, हुरडा असो किंवा ज्वारीची पांढरीशुभ्र भाकरी… खाणाऱ्याला त्यामागील कष्ट माहित नसतात. वास्तविक पेरणीपासून तर खुरपणी, राखणी, काढणी, खुडणी आणि मळणी ही सगळी कामं कष्टाची आहेत.. त्यातही शेतातील उभी ज्वारी काढण्यासाठी थेट आतड्याला कसा पिळ पडतो याचा अनुभव ज्वारी काढल्याशिवाय कळत नाही.
सध्या ज्वारी काढणीचा हंगाम सुरु असून माझ्या मतदारसंघात दैवदैठण इथं बाबासाहेब भोरे यांच्या शेतात ज्वारी काढणाऱ्या महिला भगिनींची भेट घेऊन चर्चा केली आणि ज्वारी काढण्यासाठी किती कष्ट लागतात याचाही प्रत्यक्ष अनुभव घेतला. इतक्या कष्टाचं हे काम करणाऱ्या भगिनींना सलामच करावा लागेल.
विधानसभा निवडणुकीपुरतं लाडक्या बहिणीचं मत वापरलं आणि निवडणूक झाल्यानंतर हे सरकार बहिणींना विसरल असं म्हणावे लागेल निवडणूक सुरु असतांना तीन तीन महिन्याचा अँडव्हान्स मिळत होता आता पैसे देण्यास विलंब करत आहे. तसेच अनेक निकष लावून बहिणींना अपात्र केले जात आहे ही वृत्ती आणि प्रवृत्तीला आपण काय म्हणणार अशी टिका सरकारवर शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केलीआहे.
आ. रोहीत पवार हे जामखेड तालुक्यातील मतदारसंघात दौरे करत असताना कोल्हेवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधला यावेळी आ. रोहीत पवार म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्वी टीव्हीवर दिसत होते कदाचित आता कामामध्ये ते व्यस्त असावेत असं आपल्याला म्हणावं लागेल. मात्र अंतर्गत काय झालं हे सांगता येणार नाही. भाजपा हा मित्रपक्षाचे आमदार जवळ करून त्यांची ताकद कमी करत आहे आणि हेच शिंदे साहेबांच्या बाबतीत देखील होऊ शकतो आणि त्यामुळे त्यांच्या पक्षातील मंत्री आणि आमदार भाजपा जवळ करत असल्याने शिंदे साहेब शांत झाले असावेत असं वाटतं असा टोला आ. रोहित पवारांचा यांनी लगावला.
राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा आ. रोहीत पवार यांनी जाहीर निषेध करून या लोकांना व्यवसायातून वाळीत टाकलं पाहिजे काही असे कलाकार असतात जे चर्चेत नसतात काम कुठे मिळत नाही आणि म्हणून चर्चते कसे यायचं आणि कायतरी चुकीची स्टेटमेंट करायची ही अतिशय चुकीची गोष्ट घडलेली आहे. महापुरुषांच्या बाबतीत हे घडत आहे याला कुठंतरी कंट्रोल केलं पाहिजे लहान मुले हे बघतात आणि त्यांच्या मनावर प्रभाव होऊ शकतो त्यामुळे सरकारने कुठंतरी निर्णय घेतला पाहिजे आणि अश्या लोकांना वाळीत टाकलं पाहिजे अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.
उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सायंकाळी सहा नंतर झालेल्या मतदानावर दोन आठवड्यात उत्तर द्या असे आदेश दिले याचे आपण स्वागतच केले पाहिजे. कोर्टाला देखील आश्चर्य वाटल की सहा नंतर महाराष्ट्रात 75 लाख मतदान अचानक झालं आहे आता हे मशीन ने केले आहे की कोणी केलं आहे हे बघावं लागेल तसेच ईव्हीएम मशीनला कैलिब्रेट करून हे मतदान भाजपा आणि मित्र पक्षाला गेल आहे. अशी शंका असल्याने आम्हांला सिसिटिव्ही मिळावे अशी मागणी हायकोर्टच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला करणार असल्याचे आ. रोहीत पवार यांनी सांगितले.
अशा विविध विषयांवर आमदार रोहित पवार यांनी चर्चा केली.