Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या धनंजय मुंडे यांना कोर्टाचा दणका, न्यायालयाकडून मुंडेंवरील आरोप मान्य

धनंजय मुंडे यांना कोर्टाचा दणका, न्यायालयाकडून मुंडेंवरील आरोप मान्य

0
1711

जामखेड न्युज——-

धनंजय मुंडे यांना कोर्टाचा दणका, न्यायालयाकडून मुंडेंवरील आरोप मान्य


धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्यांच्या विरोधात करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप मान्य केले आहेत. त्यामुळे करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचे या माध्यमातून कोर्टाने मान्य केले आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्यावरील दबाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील एका पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. यामध्ये त्या म्हणाल्या की, ‘करुणा मुंडे या फैमिली कोर्टात 4 फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन.

मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी. करुणा, ह्या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि दोन लाख रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.’

आधीच राजकीय दृष्ट्या अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कोर्टात करुणा शर्मा यांचा मोठा विजय झाला आहे.

करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप कोर्टाने अंशत: मान्य केले आहेत. करूणा शर्मा यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश फॅमिली कोर्टाने दिले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!