टक्कलग्रस्तांच्या सिक्रेट तेल लावण्यासाठी रांगा आरोग्यमंत्र्याच्या जिल्ह्यातील प्रकार

0
762

जामखेड न्युज——

टक्कलग्रस्तांच्या सिक्रेट तेल लावण्यासाठी रांगा

आरोग्यमंत्र्याच्या जिल्ह्यातील प्रकार

एकीकडे बुलढाण्यातील एका गावात केसगळती होऊन टक्कल पडणाऱ्यांचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय बनला असतानाच, दुसरीकडे वैद्यकीय उच्च शिक्षणमंत्री हसनमुश्रीफ आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या जिल्ह्यात चक्क केसगळती आणि टक्कलवर उपाय म्हणून एका व्यक्तीकडून ‘सिक्रेट तेल’ लावले जात आहे. हेतेल लावून घेण्यासाठी टक्कलग्रस्तांची रांग लागत आहे.

विशेष म्हणजे, याबाबत कसलेच वैद्यकीय व वैज्ञानिक प्रमाणपत्र नसतानाही ‘सलमान हेअर ट्रेनर’ नावाच्या व्यक्तीकडून हे ‘सिक्रेट तेल’ मोफत लावण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालया लगतच्या बागेत हे तेल लावून घेण्यासाठी दररोज शेकडो टक्कलग्रस्तांची रांग लागल्याचे चित्र गेल्या चार-पाच दिवसांपासून पाहावयास मिळत आहे.

कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून केसगळती आणि टक्कलवर उपाय म्हणून एक व्यक्ती अनेकांना त्याने बनविलेले ‘सिक्रेट तेल’ मोफत लावून देत आहे. विशेष म्हणजे, तो हे तेल मोफत लावून देत असल्याने दररोज मोठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे.

‘सलमान हेअर ट्रेनर’ नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावरून केलेले सादरीकरण पाहून अनेक टक्कलग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालया लगतच्या महावीर गार्डन येथे रांग लावत आहेत. आतापर्यंत यामध्ये कोणाची फसवणूक झाल्याची काहीही घटना घडली नसल्याने सध्यातरी टक्कलग्रस्त तेल लावण्यासाठी गर्दी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here