नवज्योत प्रकल्पांतर्गत वृद्धाश्रमासाठी 10 गुंठे जमीन दान 

0
382
जामखेड प्रतिनिधी 
                जामखेड न्युज – – ( सुदाम वराट) 
श्री संत वामनभाऊ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सन 2019 पासून जामखेड तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक व वारकरी सांप्रदायिक क्षेत्रात अनेक उपक्रम राबविले जात असून सन 2021 पासून नवज्योत प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी जागेची कमतरता भासू लागल्याने जामखेड येथील सौ. लक्ष्मी मिसाळ यांनी स्वतःच्या मालकीची 10 गुंठे जमीन नवज्योत प्रकल्पासाठी दान म्हणून दिली.
        संस्थेचे संस्थापक संतोष गर्जे यांनी श्री संत वामनभाऊ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. व सौ. लक्ष्मी मिसाळ यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजाविषयी असलेली तळमळ तसेच आपण समाजाचे काही देणे आहोत हि जाणीव ठेवत स्वतःच्या मालकीची साकत फाटा, बीड रोड याठिकाणी असलेली 10 गुंठे जमीन दान दिली त्याबद्दल त्यांचा सत्कार करून आभार मानले व नव्याने सुरू केलेल्या नवज्योत प्रकल्पाची संकल्पना सांगितली. कोरोना सारख्या महामारीने अनेकांना जीवन जगणे देखील कठीण झाले असल्याने त्यामध्ये अनेक वयोवृद्ध लोकांना उपासमारीने जीव गमवावा लागणे, भीक मागणे, भटकंती करणे, आत्महत्या करणे असे पर्याय निवडू लागल्याने संस्थेच्या माध्यमातून वयोवृद्ध लोकांसाठी वृद्धाश्रम व कोरोनाग्रस्त पिडीतांची मुले, निराधार, ऊसतोड मजूर, गोरगरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवज्योत प्रकल्पाची स्थापना करत असल्याचे सांगितले. प्रकल्पाच्या माध्यमातून वृद्धांना व मुलांना कपडे, आरोग्य तपासणी, जेवण, राहण्याची सोय, मनोरंजनासाठी आवश्यक ती साधन सामग्री, शैक्षणिक साहित्य, धार्मिक स्थळांना भेटी, शैक्षणिक सहली, चर्चासत्रे ई. अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले. गरजू वृद्ध व मुलांनी या सुविधांचा लाभ घेण्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांकडे संपर्क करण्याचे आवाहन केले.
     यावेळी ह. भ. प. नारायणगिरी महाराज मठाधिपती मुंबई (वाडा), संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ मिसाळ, प्रकल्प व्यवस्थापक बापूसाहेब गायकवाड,  शिवनाथ शिंदे, मोहन शिंदे, सुरेश कुमावत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here