चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी एक नवीन व्यासपीठ – श्याम पंडित एच यु गुगळे चॅरिटेबल ट्रस्ट चित्रकला स्पर्धा श्री साकेश्वर विद्यालयात संपन्न
चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी एक नवीन व्यासपीठ – श्याम पंडित
एच यु गुगळे चॅरिटेबल ट्रस्ट चित्रकला स्पर्धा श्री साकेश्वर विद्यालयात संपन्न
चित्रांमधून वेगवेगळ्या संकल्पना साकारत त्यामध्ये स्वच्छता, टापटिपपणा हा गुण चित्रामध्ये दाखवण्याचा प्रयत्न विद्यार्थी करतात हेच गुण आपोआप आपल्या जीवनामध्ये येतात. चित्रामुळे निश्चित एकाग्रता व बैठक वाढते. खरोखरच चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी एक नवीन व्यासपीठ गुगळे चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे. असे मत सर्पमित्र श्याम पंडित यांनी व्यक्त केले.
श्री साकेश्वर विद्यालयात एच यु गुगळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा सन 2003 पासून घेतल्या जात असून यावर्षी या स्पर्धेचे विसावे वर्ष आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुदाम वराट तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्पमित्र श्याम पंडित होते यावेळी अर्जुन रासकर, त्रिंबक लोळगे, सुलभा लवुळ, सचिन वराट, प्रसाद होशिंग, मुकुंद वराट, विजय हराळे अतुल दळवी, आण्णा विटकर, आश्रू सरोदे यांच्या सह सर्व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सुमारे 125 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला.
यावेळी बोलताना श्याम पंडित म्हणाले की, जीवनात स्पर्धा दुसऱ्याशी करण्यापेक्षा स्वतः शी करा, जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर आपण निश्चित यश मिळवू शकतो. गुगळे चॅरिटेबल ट्रस्टने विद्यार्थ्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे याचा फायदा घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना सुदाम वराट म्हणाले की, एच यु गुगळे चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी विनाशुल्क व ज्या त्या शाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते ही बाब उल्लेखनीय आहे. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांचे सामाजिक भान जागृत व्हावे, आपणही समाजाचे देणे लागतो, ही भावना मुलांमध्ये रुजविण्यासाठी चित्रकलेचा उपयोग होत आहे. उल्लेखनीय म्हणजे, या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही.
यावेळी त्रिंबक लोळगे यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले की. या चित्रकला स्पर्धा दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीतील चारही शाखा न्यू इंग्लिश स्कूल राजुरी, श्री. साकेश्वर विद्यालय साकत, श्री भैरवनाथ विद्यालय हळगाव व ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड या चारही ठिकाणी या चित्रकला स्पर्धा दरवर्षी घेतल्या जातात. या स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी या दोन गटांमध्ये घेतल्या जातात या दोन गटांमध्ये मिळून प्रथम द्वितीय तृतीय व दोन उत्तेजनार्थ असे एकूण दहा विद्यार्थी निवडले जातात. व यशस्वी या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात येते.
यावेळी लक्ष्मी वराट, छाया वराट यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या स्पर्धेमधून आपल्या मनातील नवनवीन संकल्पना, आयडिया या चित्रांमधून मांडल्या पाहिजे आज जाहिरातीच्या युगामध्ये नवीन संकल्पना, नवीन आयडिया याला फार महत्त्व आलेले आहे. विद्यार्थ्यांनी चित्र रेखाटण्याचा आनंद निश्चित घ्यायचा आहे. त्यासोबत नवीन पद्धतीने आपण विचार करायचा आहे.