Home राजकारण भाजपा महिला आघाडीला जामखेडमध्ये खिंडार भाजपा जिल्हा सरचिटणीस अर्चनाताई राळेभात यांची...
जामखेड न्युज———
भाजपा महिला आघाडीला जामखेडमध्ये खिंडार
भाजपा जिल्हा सरचिटणीस अर्चनाताई राळेभात यांची भाजपाला सोडचिठ्ठी
आज राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होणार प्रवेश

भाजपाच्या मनमानी व हुकुमशाही पक्षांतर्गत नाराजी या प्रवृत्तीला कंटाळून भाजपा जिल्हा सरचिटणीस अर्चनाताई राळेभात यांची भाजपाला सोडचिठ्ठी देत आज कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश करणार आहेत. यामुळे भाजपाला मोठे खिंडार पडले आहे.

भाजपाच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा तसेच विद्यमान जिल्हा सरचिटणीस अर्चनाताई संपत राळेभात तसेच पृथ्वीराजे गृपचे प्रमुख आकाश (मामा) पिंपळे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह कर्जत येथे सायंकाळी पाच वाजता श्रीराम मंगल कार्यालय कर्जत येथे शरदचंद्र पवार साहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होत आहे.

जामखेड न्युजशी बोलताना अर्चनाताई राळेभात म्हणाल्या की, आम्ही आजपर्यंत भाजपा मध्ये निष्ठेने काम केले सध्या पक्षात मनमानी, हुकुमशाही सुरू आहे. याच पक्षार्तगत नाराजी मुळे आम्ही पक्षाला सोडचिठ्ठी देत आहोत.

अर्चनाताई राळेभात यांनी भाजपा महिला उपाध्यक्ष पद सांभाळले आहे सध्या त्या महिला जिल्हा सरचिटणीस आहेत. २०१० मध्ये त्या अपक्ष जामखेड ग्रामपंचायतीच्या बिनविरोध सदस्या होत्या. त्या उच्च शिक्षित असून मैत्रिण गृपच्या माध्यमातून महिला संघटन करणे, हिंदू जनजागृती महिला व मुलींमधे जनजागृती साठी व्याख्याने, अन्यायाविरुद्ध लढाऊबाणा तसेच समाजकार्यात त्या अग्रेसर असतात.

त्यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक कामे केलेली आहेत महिला मेळावे घेत जनजागृती करत असतात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, शालेय साहित्य वाटप, तसेच वर्ग खोल्यात घड्याळ, फँन, बसवले, दुष्काळी भागात टँकर, आरोळे हाँस्पीटल मध्ये रूग्णांना फळे वाटप असे अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.

तसेच त्यांचे बंधू आकाश (मामा ) पिंपळे हे पृथ्वीराजे गृपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात युवकांचे संघटन आहे. गेल्या वीस वर्षांपासून ते गणपती उत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबवितात. तरूणांची मोठी फळी त्यांच्या बरोबर आहे.

महिला आघाडी च्या अर्चनाताई राळेभात व युवकांच्या गळ्यातील ताईत आकाश (मामा) पिंपळे
यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत असल्याने भाजपाला मोठे खिंडार पडले आहे. आज हजारो कार्यकर्त्यांसह कर्जत येथे शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश होत आहे.

error: Content is protected !!