आमदार प्रा. राम शिंदे यांनी विकासाबाबत समोरासमोर चर्चेसाठी यावे आमदार रोहित पवारांचे आवाहन

0
741

जामखेड न्युज——

आमदार प्रा. राम शिंदे यांनी विकासाबाबत समोरासमोर चर्चेसाठी यावे आमदार रोहित पवारांचे आवाहन

 

कर्जत जामखेड हा भाजपाचा बालेकिल्ला 2019 मध्ये रोहित पवार यांनी याला तडा देत जोरदार एन्ट्री केली प्रा. राम शिंदे मंत्री असतानाही यांचा पराभव झाला राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आमदार रोहित पवार यांनी आपले राजकीय वचन वापरून मोठ्या प्रमाणावर निधी आणला अडीच वर्षात भाजपाने आमदार प्रा राम शिंदे यांना विधानपरिषदेवर घेतले आणि राज्यात सत्तांतर होत महायुतीची सत्ता स्थापन झाली आणि आमदार रोहित पवार व आमदार प्रा राम शिंदे यांच्यात विकास कामावरून संघर्ष सुरू झाला.

प्रा राम शिंदे 2009 ते 2014 पाच वर्षे आमदार होते नंतर 2014 ते 2019 या काळात त्यांना मंत्री पदाची संधी मिळाली या काळात त्यांनी मोठ्या प्रमाणावर निधी आणला. 

2019 मध्ये आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव करत जोरदार एन्ट्री केली महाविकास आघाडीचे सरकारही आले आणि या काळात शासकीय निवासस्थाने, नागेश्वर मंदिर रस्ता, शालेय मुलांना सायकल, कंपास, रायटिंग पँड वाटप केले. ग्रामीण भागात जलजीवन कामे, पानंद रस्ते मार्गी लावले कोरोना काळात गोरगरीब जनतेला मोठ्या प्रमाणावर आधार दिला अडीच वर्षात प्रा शिंदे विधानपरिषदेचे आमदार झाले सत्ता महायुतीची आली आणि संघर्ष सुरू झाला.

कुसडगाव येथील सीआरपीएफ केंद्र, कर्जत एमआयडीसी, जामखेड पाणीपुरवठा योजना, भुमीगत गटार, जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग, पीकविमा मंजुरी यासह अनेक कामाबाबत सध्या श्रेयवाद सुरू आहे. मीच कामे मंजूर केले मीच आणले असा श्रेयवाद रंगलेला आहे. मागील आठवड्यात एकदा आमदार प्रा. राम शिंदे म्हणाले की, रोहित पवार यांनी पाच वर्षांत काय केले हे सांगावे तर स्वाभीमान यात्रेत आमदार रोहित पवार यांनी सांगितले की, मी पाच वर्षांत काय केले हे ऐकायचे असेल तर आमदार प्रा राम शिंदे यांनी समोरासमोर यावे मग मी काय काम केले हे सांगतो असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.

रोहित पवारांची राम शिंदेंवर टीका

काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. मुंबईला गेल्यानंतर माणूस गोरा कसा होतो हे मला माहिती नाही. आता तर कहरच झालाय. माझं वय 38 मी युवाच आहे. मात्र माझ्या विरोधकांनी (राम शिंदे) वीस लाख रुपये देऊन कन्सल्टंट घेतल्याचं कळालं आणि कन्सल्टंटला सांगितलं की, रोहित पवारांची कॉपी करायची. पण, माझे केस आहेत. मी केस काळे करत नाही, मला लपवाछपवी जमत नाही. वीस लाख रुपये दिलेल्या त्या कन्सल्टंटने त्यांना (राम शिंदे) सांगितलं की, तुम्हाला युवा दिसावं लागेल, तुमचे केस काळे करावे लागतील. तर त्यांनी लगेच केस काळे केले. कपडे देखील युवकांसारखे घालावे लागतील. तर घालायला लागले असं म्हणत रोहित पवारांनी राम शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती.

राम शिंदेंचे रोहित पवारांना प्रत्युत्तर

या टिकेला आता भाजप आ. राम शिंदे यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. रोहित पवार यांना मतदारसंघातील प्रश्न आता कळून चुकलेत, आता ते थेट माझ्या लुकवर बोलू लागलेत. पण मी ग्रामीण भागातला खेडूत माणूस आहे. आता कपडे कोणते घालावेत तर मी पॅन्ट शर्टच घालतोय. त्यांनी माझ्या लुकवर बोलायला सुरुवात केली याचा अर्थ त्यांना इतर कोणतेही प्रश्न शिल्लक राहिलेले नाहीत. माझ्या लूकवर बोलण्यापेक्षा मतदारसंघात पाच वर्ष काय केलं हे त्यांनी जनतेला सांगावं, असं राम शिंदे यांनी म्हटले आहे.


शरद पवारांचा राम शिंदेंना टोला

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम शिंदे यांना टोला लगावला होता. त्यांनी म्हटलं होतं की, उभं करायला अक्कल लागते. पण उभं केलेलं उद्ध्वस्त करायला अक्कल लागत नाही. रोहित पवार चांगले काम करत आहे. त्याला मदत करता आली नाही तर त्याच्या कामात खोडा घालू नका असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे आमदार राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता.

सध्या कर्जत जामखेड मतदारसंघाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आणि आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांच्यात मोठ्या प्रमाणावर श्रेयवाद रंगलेला आहे. यातच आमदार प्रा. राम शिंदे यांनी विकासाच्या बाबतीत समोरासमोर चर्चेसाठी यावे असे आमदार रोहित पवार यांनी आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here