Friday, March 13, 2026
Home शैक्षणिक बातम्या नॅशनल स्पर्धेत विदर्भ संघ देशात तिसरा, डॉ सुशील तांबे यांच्या ओशन...

नॅशनल स्पर्धेत विदर्भ संघ देशात तिसरा, डॉ सुशील तांबे यांच्या ओशन क्रिकेट अकॅडमी पाटोदा येथील मुले चमकली

0
548

जामखेड न्युज ——-

नॅशनल स्पर्धेत विदर्भ संघ देशात तिसरा,

डॉ सुशील तांबे यांच्या ओशन क्रिकेट अकॅडमी पाटोदा येथील मुले चमकली

 

नाशिक येथे आयोजित सहाव्या नॅशनल टेनिस क्रिकेट स्पर्धेत विदर्भ संघाने तिसरा येण्याचा पराक्रम केला. या संघात ओशन क्रिकेट अकॅडमी चे मुले चमकली. या संघाला प्रशिक्षक म्हणून डॉ सुशील तांबे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

सविस्तर वृत्त असे की नाशिक येथे टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑ इंडिया तर्फे नॅशनल चॅम्पियन शिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेत देशातील विविध राज्याच्या साघांनी भाग घेतला. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून देशात तिसरा येण्याचा मान विदर्भ साघांने मिळवला.

या संघात ओशन क्रिकेट अकादमी पाटोदा चे सुयोग जाधव, तेजस चोले, शांतनू दूध वडे व शुभम घोडेस्वार यांना संधी मिळाली.

या संघाच्या प्रशिक्षक पदाची जिम्मेदारी बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील डॉ सुशिल तांबे सर (ओशन क्रिकेट अकादमी) यांना देण्यात आली होती.


देशातील स्पर्धेत प्रथमच विदर्भ टेनिस क्रिकेट संघाने अशी कामगिरी केल्यामुळे त्यांचे महाराष्ट्र राज्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

या स्पर्धेचे आयोजन टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया चे अध्यक्ष गुज्जर सर व सचिव श्रीम ती मीनाक्षी गिरी यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!