आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा 10844 महिलांची आरोग्य तपासणी, 2922 तरूणांचे रक्तदान, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप, अन्नदान, सांस्कृतिक कार्यक्रम

0
549

जामखेड न्युज——

आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

10844 महिलांची आरोग्य तपासणी, 2922 तरूणांचे रक्तदान, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप, अन्नदान, सांस्कृतिक कार्यक्रम

 

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहित पवार हे त्यांचा वाढदिवस नेहमीच विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करत असतात. यंदाही समाजसेवा आणि विकास कार्यांमध्ये सदैव पुढे असलेल्या रोहित पवार यांनी वाढदिवसानिमित्त महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम हाती घेतला.

मतदारसंघातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं, ज्यात कर्जत आणि जामखेड तालुक्यांमधील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

पाच दिवस चाललेल्या या भव्य शिबिरात कर्जत तालुक्यातील ५ हजार ६७ आणि जामखेड तालुक्यातील ५ हजार ७७७ अशा एकूण १० हजार ८४४ महिलांची आरोग्य तपासणी कऱण्यात आली. योग्य वैद्यकीय तपासणीनंतर त्या महिलांना आवश्यक ते औषध उपचारही कऱण्यात आले. या शिबिराने महिलांमध्ये आरोग्यविषयक जाणीव वाढवली.

 

या समाजसेवेची प्रेरणा फक्त रोहित पवार यांच्यापर्यंत मर्यादित राहिली नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही याच सामाजिक जाणीवेचं अनुकरण करत, वाढदिवसानिमित्त मतदारसंघात एकाच दिवशी तब्बल २८ ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं.

मतदारसंघात घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये कर्जत तालुक्यात १ हजार ५७३ आणि जामखेड तालुक्यात १ हजार ३६० रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजासाठी मोलाचे योगदान दिले. या उपक्रमांना आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचं कौतुक करत प्रत्येक रक्तदात्यांचे आभार मानले.

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात इतरही अनेक सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले. वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप, अन्नदान, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

कोट,

“माझा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला, यासाठी मी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक आणि रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे मनापासून आभारी आहे. समाजासाठी असं काम करण्याची प्रेरणा तुमच्यामुळेच मिळते. यापुढेही आपण असाच सेवाभावी प्रवास सुरू ठेवू. मी सोबत आहे, तुम्हीही सोबत राहा.”

– रोहित पवार

(आमदार – कर्जत जामखेड विधानसभा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here