जामखेड न्युज——
भागचंद शाहुराव उगले यांना राज्यस्तरीय कृषीरत्न पंजाबराव देशमुख पुरस्कार प्रदान
जामखेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
जामखेड तालुक्यातील नायगाव येथील आदर्श शेतकरी भागचंद शाहुराव उगले यांना राज्यस्तरीय कृषीरत्न पंजाबराव देशमुख पुरस्कार दि. २९ रोजी मुंबई येथे राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दादा भुसे, धनंजय मुंडे, दिपक केसरकर कृषी सचिव, कृषी आयुक्त यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आला. याबद्दल उगले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
२०२०,२१, २२ या वर्षात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषीरत्न पंजाबराव देशमुख पुरस्कार प्रदान करण्यात येतो. भागचंद शाहुराव उगले रा. नायगाव ता. जामखेड यांनी उडिद पिकाचे विक्रमी उत्पादन काढले होते. याच कामाची दखल घेत राज्य शासनाने त्यांना राज्यस्तरीय कृषीरत्न पंजाबराव देशमुख पुरस्कार प्रदान केला आहे.
भागचंद उगले हे शेतीत नेहमीच वेगवेगळे प्रयोग राबवित असतात. आधुनिक पद्धतीने उच्चांकी उत्पादन काढण्यात त्यांचा हातखंडा आहे सध्या त्यांच्या शेतात कांदा, ऊस, सोयाबीन ही पीके आहेत तर रब्बी हंगामात ते गहू व हरभरा पिकांचे उत्पादन घेतात. उडिद पिकातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
भागचंद उगले यांना राज्यस्तरीय कृषीरत्न पंजाबराव देशमुख पुरस्कार दि. २९ रोजी मुंबई येथे राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, कृषी मंत्री धनंजय मुंडे, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर कृषी सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आला याबद्दल त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
उगले यांना राज्यस्तरीय कृषीरत्न पंजाबराव देशमुख पुरस्कार मिळाल्याबद्दल कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार, मंगेश (दादा) आजबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजयसिंह गोलेकर, सरपंच चंदु उगले, युवराज उगले, कृषी अधिकारी रविंद्र घुले, कृषी अधिकारी पाटील, कृषी अधिकारी अडसूळ यांच्या सह मित्रमंडळी, नातेवाईक, अधिकारी, पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
भागचंद उगले यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा राज्यस्तरीय पंजाबराव देशमुख पुरस्कार मिळाला आहे यामुळे जामखेड तालुक्यासह नायगाव परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.