जामखेड महाविद्यालयाचा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन जल्लोष युवा महोत्सव २०२४ मध्ये झेंडा

0
520

जामखेड न्युज——

जामखेड महाविद्यालयाचा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन जल्लोष युवा महोत्सव २०२४ मध्ये झेंडा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत बारामती येथे संपन्न झालेल्या,”जल्लोष “ आंतर-महाविद्यालयीन युवा महोत्सव’ 2024 मध्ये जामखेड महाविद्यालय जामखेडला तीन पारितोषिके मिळाली.

जामखेड महाविद्यालयाची आरती मते हिने या महोत्सवात शास्त्रीय गायनात व अक्षता किंभहुने हिने ‘वक्तृत्व स्पर्धेमध्ये तर प्रीती सुतार या विदार्थ्यांनीला ‘मेहंदी स्पर्धेमध्ये दुसरे पारितोषिक प्राप्त झाले.

या स्पर्धा १९ सप्टेंबर २०२४ रोजी बारामती येथे विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, बारामती, जि. पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्या होत्या. 

या सर्व विजेत्या विद्यार्थिनींचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम एल डोंगरे, संस्था संचालक मंडळ, प्राध्यापक यांनी हार्दिक अभिनंदन केले. तसेच भावी यशासाठी सर्वाना शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिल्यास महाविद्यालयाच्या नावलौकिकात विद्यार्थी भर घालतील अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त करून सांस्कृतिक मंडळाच्या सर्व शिक्षकांचे मनापासून कौतुक केले.

या यशाबद्दल दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव (बापू) देशमुख, उपाध्यक्ष अरुण (काका) चिंतामणी, सचिव शशिकांतजी देशमुख, खजिनदार राजेशजी मोरे, सर्व संचालक मंडळ सदस्य, महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य या सर्वांनी मनापासून कौतुक करून अभिनंदन केले.

सांस्कृतिक विभाग समन्वयक, डॉ. देशपांडे आर.के., विद्यार्थी विकास अधिकारी, डॉ. गौरव मस्के, डॉ. गायकवाड अश्विनी, प्रा. कांबळे राहुल, प्रा. भाकरे राहुल तसेच सांस्कृतिक मंडळ कमिटीचे सर्व सदस्य, उपप्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पदक विजेत्या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here