जामखेड न्युज——
ऊसतोडणी मजुरांचे ज्ञानराधा पतसंस्थेत अडकले कोट्यवधी रुपये
सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन दिला दिलासा

ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेच्या जामखेड शाखेत तालुक्यातील गोरगरीब, ऊसतोड मजुरी करणारे, पोटाला चिमटा देऊन पै पै करून अनेक गावातील व वाडी वस्तूवरील लोकांनी कोट्यवधी रुपयांच्या ठेवी पतसंस्थेत आहेत. सहा महिन्यांपासून बँक बंद आहेत. यामुळे ठेवीदार चिंतेत आहेत. अनेक ठेवीदारांच्या मुलांमुलींची लग्ने रखडली आहेत. अनेकांना आजारपणात उपचारासाठी पैसे नाहीत. मुलामुलींची शिक्षण थांबले आहेत. यामुळे ठेवीदार चिंतेत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी व यातून मार्ग काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे प्रयत्न करत आहेत. आज त्यांनी पिंपळवाडी येथे जाऊन ठेवीदारांची भेट घेऊन दिलासा दिला आहे.

ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेमध्ये ज्या ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत त्या सर्व सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी आज दिनांक 18 रोजी वार बुधवार रोजी यांना जामखेड तालुक्यातील गोरगरिबांच्या, शेतकरी, कामगार या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी पिंपळवाडी ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

यांनाही समाधानाचं वातावरण निर्माण झाले जामखेड शहराचे जाणकार व्यक्तीमत्व आदरणीय रमेश दादा आजबे यांनी पिंपळवाडी ग्रामस्थांचीभेट घेवून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले गावातील ग्रामस्थांनी सर्वांनी एक मतांनी सांगितले आम्ही शनिवारच्या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहू असा शब्द रमेश दादा यांना दिला.

बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टे को-ऑप सोसायटीकडे कर्जत-जामखेड तालुक्यातील सुमारे साडेसहा हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या ९० कोटी रुपयांहून अधिक ठेवी आहेत. परंतु या संस्थेकडून या ठेवीदारांची फसवणूक झाली आहे. या संस्थेची चौकशी करुन कारवाई करावी आणि कर्जत- जामखेड मतदारसंघातील ठेवीदारांसह सर्वच ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत यासाठीही आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती त्यामुळे ठेवीदारांमध्ये न्याय मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली होती.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर मोलमजुरी करण्याची वेळ

मुलांमुलींच्या उच्च शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी विश्वासाने अनेकांनी सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा पतसंस्थेत आपल्या आयुष्याची पुंजी ठेवली, स्वतः च्या पोटाला चिमटा घेऊन, मोलमजुरी करून, सेवानिवृत्ती नंतर उर्वरित आयुष्य व्याजाच्या पैशावर गुजरान करावी म्हणून जामखेड परिसरातील ठेवीदारांनी ज्ञानराधा को – आँप क्रेडीट सोसायटी जामखेड शाखेत जामखेड व परिसरातील ६५०० ठेवीदारांचे ९० कोटी रुपये रूपये ठेव आहेत. त्या लवकरात लवकर मिळाव्यात अशी मागणी आहे.









