मुलींची छेड काढणाऱ्यांना सुट्टी नाही – सपोनि विजय झंजाड

0
880

जामखेड न्युज——

मुलींची छेड काढणाऱ्यांना सुट्टी नाही – सपोनि विजय झंजाड

मुलींना बघून शिटी मारणे, रस्त्यात थांबवणे, छेड काढणे, त्यांच्याकडून फोन नंबर मागणे, नाव विचारणे असे छेडछेडाचे प्रकार घडत असल्याचे आपण सतत पाहतो. मुलींची छेड काढणाऱ्यांना आता सुट्टी नाही असा इशारा खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी दिला आहे.

 

खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील सोनेगाव येथील श्री संत कैकाडी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सोनेगाव येथे शालेय शिक्षण कमिटी व मुख्याध्यापक, शिक्षक यांजकडून विद्यार्थी-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते.

 

सदर मेळाव्याचे कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून शिक्षकांचे व पालकांच्या समस्या जाणून घेऊन बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने काय प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी व उपाययोजना राबवाव्यात याबाबत पालकांना व शिक्षकांना माहिती सांगितली.

 

खर्डा पोलीस स्टेशनकडून राबविण्यात येणाऱ्या पोलीस काका व पोलीस दीदी या संकल्पनेची माहिती दिली. तसेच महिला शिक्षकांना व महिला पालकांना अल्पवयीन मुलींना गुड टच व बॅड टच बाबत प्रशिक्षण देण्यास सुचवण्यात आले व शिक्षकांना व पालकांना पोक्सो कायद्याबाबत माहिती दिली.

शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ चे कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घेणे अनिवार्य असलेबाबत सूचना मुख्याध्यापक व स्कुल कमिटी यांना देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here