जामखेड न्युज——
आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांनी एकत्रित फोडली दहिहंडी

खर्डा येथील सिताराम गड धार्मिक शक्तीपीठ असून या ठिकाणी आल्यानंतर काम करण्याची ऊर्जा निर्माण होते असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. ते खर्डा येथील सिताराम गडावर आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनाच्या प्रसंगी बोलत होते. काल्याची दहीहंडी महालिंग महाराज नगरे, आमदार रोहित पवार व आ. प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते फोडण्यात आली. यावेळी आमदार रोहित पवार यांनी प्रा. मधुकर राळेभात यांचा नामोल्लेख टाळला.

याप्रसंगी आमदार रोहित पवार, आमदार राम शिंदे, प्रा. मधुकर राळेभात, सरपंच संजीवनी पाटील, विजयसिंह गोलेकर, ह. भ. प. उत्तम महाराज वराट, रवी सुरवसे, संजय गोपाळघरे, शरद कार्ले, प्रकाश गोलेकर, आसाराम गोपाळघरे, हरी गोलेकर, चंद्रकांत गोलेकर, श्रीकांत लोखंडे, रामहरी गोपाळघरे, महेश दिंडोरे, शिवाजी भोसले, बाजीराव गोपाळघरे, दादा जमकावळे अनेक महाराज व भक्तजन उपस्थित होते.

ते बोलताना पुढे म्हणाले की सिताराम गडासाठी तीन कोटीचा तर गीते बाबा मठाला सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून पुढील काळात सिताराम गडाच्या दोन्ही बाजूने मोठे प्रवेशद्वार (कमानी) पुढील सप्ताहा पर्यंत पूर्ण करून घेईल. सिताराम गडासाठी दहा लाख रुपयांची देणगी त्यांनी यावेळी जाहीर केली. पुढील काळातही सिताराम घालावा भरीव निधी देण्याची त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

आमदार राम शिंदे म्हणाले की मी मंत्री व पालकमंत्री असताना सिताराम गडासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता सिताराम गड हे सर्व धर्म समभावाचे प्रतीक आहे या ठिकाणी आलेला माणूस काहीतरी दिल्याशिवाय जात नाही या गडाचे पवित्र राखण्याचे काम भक्तगणांनी करावे असे आवाहन आमदार शिंदे यांनी केले.

यावेळी मधुकर आबा राळेभात यांनी सांगितले की गीते बाबा मठ व सिताराम गड हे खर्डा व परिसराचे शक्तिपीठ असल्याचे सांगितले आहे व सिताराम गडाचे महत्व त्यांनी पटवून दिले.
शिर्डी हैदराबाद राज्य महामार्गावरील सिताराम गड येथे सिताराम बाबा यांच्या दहाव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त श्री चतुर्भुज विष्णू मूर्ती, श्री सद्गुरु सिताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व सुवर्णकलष वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

सप्ताहाची सांगता मठाधिपती महालिंग महाराज नगरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. यावेळी सिताराम गड येथे झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, संगीत श्रीमद् भागवत कथा, ज्ञानयज्ञ सोहळा, कीर्तन, संगीत जागर, हरिजागर अन्नदान , सिताराम बाबाच्या पादुका व प्रतिमेचे सजवलेल्या रथातून शहरातून मिरवणूक, शहर व परिसरातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान, लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन यासह कलश पूजन, प्रतिमा पूजन, विष्णुपूजन, दीप प्रज्वलन ,संगीत भागवत कथा, कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने सप्ताहाची सांगता होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
काल्याची दहीहंडी महालिंग महाराज नगरे, आमदार रोहित पवार व आ. प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते फोडण्यात आली.
याप्रसंगी अ.नगर, बीड,धाराशिव, सोलापूर जिल्ह्यातून व खर्डा परिसरातील लाखो भावीक भक्त कार्यक्रमास उपस्थित होते. भाविक भक्तांनी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाल्यावर काल्याच्या कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड सह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.





