Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडच्या पाच खेळाडूंची पुणे विभागीय शालेय थांगता मार्शल आर्ट स्पर्धेसाठी निवड

जामखेडच्या पाच खेळाडूंची पुणे विभागीय शालेय थांगता मार्शल आर्ट स्पर्धेसाठी निवड

0
654

जामखेड न्युज——

जामखेडच्या पाच खेळाडूंची पुणे विभागीय शालेय थांगता मार्शल आर्ट स्पर्धेसाठी निवड

 

नवीन मराठी शाळा, जामखेड येथे थांगता जिल्हा संघटनेचे सचिव व मुख्य प्रशिक्षक लक्ष्मण उदमले उपाध्यक्ष व प्रशिक्षक शाम पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली थांगता मार्शल आर्टचे पाच खेळाडूंनी जिल्हास्तरीय थांगता मार्शल आर्ट स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे तर दोन विद्यार्थ्यीनींनी रोप्य पदक मिळवले सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंची निवड पुणे विभागीय शालेय थांगता मार्शल आर्ट स्पर्धेसाठी झाली आहे.

अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,थांगता असोशिएशन ऑफ अ.नगर जिल्हा आणि भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर येथे जिल्हास्तरीय शालेय थांगता मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या.

या स्पर्धाध्ये श्रेयस वराट, मयूर शिरगिरे- श्री नागेश विद्यालय जामखेड, पृथ्वीराज पंडित, योगेश वाघमोडे, शाहिद शेख- ल.ना.होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड यांनी सुवर्ण पदक मिळविले,


तर अंजली लोखंडे व राजनंदिनी गोरे दोन्ही कन्या विद्यालय, जामखेड यांनी रौप्य पदक मिळविले.

सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंची निवड पुणे विभागीय शालेय थांगता मार्शल आर्ट स्पर्धेसाठी झाली आहे. सर्व खेळाडू नवीन मराठी शाळा, जामखेड येथे थांगता जिल्हा संघटनेचे सचिव व मुख्य प्रशिक्षक लक्ष्मण उदमले उपाध्यक्ष व प्रशिक्षक शाम पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली थांगता मार्शल आर्ट खेळाचा सराव करत आहेत.


सर्व खेळाडूंचे,जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, तालुका क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, कर्जत-जामखेड चे आमदार रोहित दादा पवार,व प्रा.राम शिंदे, मा.जि.प.सदस्य प्रा.मधुकर राळेभात, प्राचार्य श्रीकांत होशिंग, प्राचार्य बी.के.मडके मुख्याध्यापिका चौधरी मॅडम, क्रीडा शिक्षक तालुका प्रमुख प्रल्हाद साळुंखे, क्रीडा शिक्षक धीरज पाटील, ठाकरे सर, राघवेंद्र धनलगडे, मयुर भोसले, अनिल देडे, आबा जायगुडे, प्रशिक्षक लक्ष्मण उदमले ,शाम पंडित यांच्यासह अनेकांनी हार्दिक अभिनंदन केले व विभागीय थांगता मार्शल आर्ट स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!