जामखेड न्युज——-
सनराईज स्कूल मध्ये रक्षाबंधनक्ष निमित्त लाडक्या बहिणीसाठी शालेय साहित्य वाटप
मंगळवार दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी सनराईज इंग्लिश स्कूल, पाडळी . याठिकाणी बहीण- भावाच्या नात्याचे अतूट बंधन रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,यावेळी सर्व लाडक्या बहिणींनी भावना राख्या बांधून खाऊ वाटप केले तर लाडक्या बहिणीसाठी भावांनी शालेय साहित्य वाटप केले.
रक्षाबंधनाच्या या कार्यक्रमासाठी माननीय डॉ. विशाल बोराटे यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संचालक तेजस भोरे यांनी डॉ . विशाल बोराटे यांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे नियोजन स्कूल चे प्रिंसिपल अमर भैसडे यांनी केले होते.
यावेळी सहशिक्षक बिभीषण भोरे, सागर कदम, सुरज वाघमारे, जयश्री कदम, जयश्री सपते, हर्षा पवार, सानिया सय्यद, दीपक दहिकर व विध्यार्थी उपस्थित होते.