जामखेड न्युज———-
साकतच्या तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदी दिनकर मुरूमकर बिनविरोध

जामखेड तालुक्यातील साकतच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी दिनकर विष्णू मुरूमकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली विविध क्षेत्रातील व्यक्ती कडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

आज 15 ऑगस्ट 2024 रोजी साकत ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली होती या ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष माननीय श्री त्रिंबक अण्णा मुरूमकर हे वयोवृद्ध झाल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

त्यामुळे ग्रामसभेमध्ये नवीन अध्यक्ष निवडीचा ठराव मांडण्यात आला व सर्व ग्रामस्थांच्या वतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी माननीय श्री दिनकर मुरूमकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

त्यावेळी साकत ग्रामपंचायतच्या वतीने उत्कृष्ट काम केल्याबद्दल साकतचे पोलीस पाटील डॉ. महादेव वराट व समितीच्या अध्यक्षपदी दिनकर मुरूमकर यांची निवड झाल्याबद्दल दोघांचाही ग्रामपंचायत च्या वतीने सन्मान करण्यात आला.

महात्मा तंटामुक्त गाव मोहिमेचा मूळ उद्देशच सामोपचाराने तंटे मिटविणे असा आहे. साकत मध्ये आतापर्यंत पोलीस पाटील डॉ. महादेव वराट तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यांनी खुप चांगल्या प्रकारे काम करत गावातील तंटे गावातच मिळवलेले आहेत. यामुळे खुपच तुरळक तक्रारी जामखेड पोलीस स्टेशन पर्यंत गेलेल्या होत्या. अनेक तक्रारी गावातच सामोपचाराने मिटवण्यात तंटामुक्त समितीला चांगले यश मिळाले आहे.

तंटामुक्त समितीमध्ये चांगले काम केल्यामुळे पोलीस पाटील डॉ. महादेव वराट यांना आदर्श पोलीस पाटील पुरस्कार मिळालेला आहे.
आता गावातील आदर्श व्यक्ती सेवानिवृत्त वनपाल दिनकर मुरूमकर हे निःपक्षपाती काम करत आतापर्यंत तंटामुक्त समितीला वेळोवेळी मदत करत सत्याची बाजू लावून धरत अनेक तंटे मिटवलेले आहेत आता तर ते तंटामुक्त समितीचे अध्यक्ष झाले आहेत. यामुळे गावातील तंटे गावातच सामोपचाराने मिटतील अशी आशा ग्रामस्थांना आहे. ग्रामपंचायत च्या वतीने नवनियुक्त अध्यक्ष दिनकर मुरूमकर व पोलीस पाटील डॉ. महादेव वराट यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच हनुमंत पाटील, उपसरपंच राजाभाऊ वराट, सदस्य शहादेव वराट, विठ्ठल वराट, सचिन नेमाने, डॉ. बाबू वराट, मुख्याध्यापक दत्ता काळे, हरीभाऊ वराट, महादेव घोलप, पांडुरंग वराट, सचिन वराट सर, विजय वराट, राम जावळे, सतिश लहाने, मोहिते यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.









