जामखेड न्युज——
उमेदवार कर्जत जामखेड मतदारसंघातीलच हवा – अंबादास पिसाळ
निमित्त वाढदिवसाचे रणनिती विधानसभेची
प्रा. मधुकर राळेभात यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा
सध्या कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार हे प्रतिनिधित्व करत आहेत. ते बारामतीचे आहेत. सध्या मतदारसंघाघातील जनतेची भावना अशी आहे की, विधानसभेचा उमेदवार हा कर्जत जामखेड मतदारसंघातीलच असावा आम्ही सर्व त्याच्या पाठिशी ठामपणे उभे राहू असे मत ज्येष्ठ नेते व जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांनी व्यक्त केले.
जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर (आबा)
राळेभात यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जामखेड बरोबरच कर्जत येथील अनेक नेते शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. निमित्त वाढदिवसाचे मात्र रणनीती विधानसभेची अशीच चर्चा सगळीकडे सुरू होती.
यावेळी बोलताना अंबादास पिसाळ म्हणाले की, कर्जत जामखेड मतदारसंघातील ज्याला महायुतीचे तिकीट असेल त्यांच्या मागे आम्ही सर्व जण राहू.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र गुंड म्हणाले की, कर्जत जामखेड मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस च्या वाट्याला आहे 2019 मध्ये आम्ही रोहित पवार निवडून आणले. ही जागा घड्याळाची आहे. आणि आताही घड्याळाचाच उमेदवार निवडून येईल.
प्रा. मधुकर राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील धाकटी पंढरी (धनेगाव) येथे सकाळी ८.३९ वाजता वृक्षारोपण, सकाळी १०.३० वाजता श्री क्षेत्र सिताराम गड येथे अभिषेक व वह्यांचे वाटप करण्यात आले. शहरातील महावीर भवन येथे प्राध्यापक मधुकर आबा राळेभात मित्र मंडळ आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हभप महाराजांचा सन्मान व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी शेतकरी, शिक्षक, डॉक्टर असोसिएशन, वकील बार संघटना, व्यापारी आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्राध्यापक मधुकर (आबा) राळेभात यांचा सत्कार केला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड.कैलास शेवाळे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गुंड,उपमहाराष्ट्र केसरी बबन काशिद, निवृत्त कर आयुक्त नागेश जाधव ,काँग्रेस तालुका अध्यक्ष शहाजी राजेभोसले, राजेंद्र कोठारी, दिलीप बाफना, सभापती पै.शरद कार्ले, सुर्यकांत मोरे, प्रकाश सदाफुले, हरिभाऊ बेलेकर,माजी सभापती गोरख शिंदे,मुस्लिम पंच कमिटी चे अध्यक्ष अझहरभाई काझी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष राजेंद्र गोरे,प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, प्राचार्य विकी घायतडक, उमर कुरेशी, वसिम कुरेशी, संतोष गव्हाळे,हभप ठाकरे महाराज,हभप गाडे महाराज, बापूसाहेब शिंदे, नगरसेवक दिगंबर चव्हाण,अमित चिंतामणी,मोहन पवार, अशोक शेळके, मोहन गडदे,इस्माईल सय्यद, मुख्तार सय्यद, इमरान कुरेशी, एडवोकेट बंकटराव बारवकर,हर्षल डोके, महारुद्र नागरगोजे, अमित गंभीर,महालिंग कोरे,मयुर भोसले,अनिल बाबर,प्रा.राहुल आहिरे,सरफराज पठाण, दिपक खेडकर, प्रविण उगले, गौतम बाफना,संदिप राळेभात, पिंटूशेठ बोरा आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवव्याख्याते जाकीर शेख तर सूत्रसंचालन हनुमंत निकम यांनी केले व आभार प्रदर्शन अमित जाधव यांनी मानले.
निमित्त वाढदिवसाचे मात्र रणनीती विधानसभेचीच अशीच चर्चा सगळीकडे आहे.